प्रतापगडावर (Pratapgad) शीघ्र कृती दलाच्या तुकडीनं अफजलखानाच्या कबर (Afzal Khan) परिसरात बंदोबस्त ठेवलाय.
महाबळेश्वर (सातारा) : सध्या देशभरात वाराणसीतील ज्ञानवापी मशीद व मंदिर याबाबत वादविवाद सुरू असल्याने त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं प्रतापगडावर (Pratapgad) शीघ्र कृती दलाच्या तुकडीनं अफजलखानाच्या कबर (Afzal Khan) परिसरात बंदोबस्त ठेवलाय.शीघ्र कृती दलाचे नवी मुंबईचे असिस्टंट कमांडंट स्वप्निल पाटील यांच्यासह ५० जवान व क्युआरटीचे १५ जवान असे महाबळेश्वर पोलीस ठाण्यात (Mahabaleshwar Police Station) दाखल झाले आहेत. त्यांच्यासह पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. बैठकीस स्वप्निल पाटील व पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे - खराडे, पोलिस निरीक्षक देवकर , पोलिस निरीक्षक भरणे व शहरातील शांतता समितीचे सदस्य रोहित ढेबे, सलिम बागवान, नगरसेवक अफजल सुतार, युसुफ शेख, प्रकाश पाटील, महेश गुजर, अशोक शिंदे व नागरिक उपस्थित होते. बैठकीत ज्ञानवापी मशीद व मंदिर या अनुषंगानं जातीय तणाव निर्माण होणार नाही व संभाव्य मशीद, मंदिर वाद या विषयावर चर्चा केली.त्यानंतर महाबळेश्वरातील नागरिकांनी व्हाॅटसअॅप व इतर ऐकीव बातम्याकडं लक्ष देवू नये, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा व जातीय तणाव निर्माण झाल्यास कशाप्रकारे उपाय योजनेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.दरम्यान, शीघ्र कृती दलाचे जवान प्रतापगड पायथ्यालगत असलेली अफजल खान कबर इथं रवाना होऊन कबर परिसराची पाहणी केली. तिथं दलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं. कबरीजवळ बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना स्वप्निल पाटील यांनी खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना केल्या.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.