राजापूर: श्रावण सरींची पावसाची सुरू असलेली भुरभूर, त्याच्या जोडीने डोंगर रांगामधून दाटून येणारे आणि मनाला हवेहवेसे वाटणारे दाट धुके आणि त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन.अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागातील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. एरवी काळा तुळतुळीत आणि कोरडा दिसणारा कातळ परिसर आकर्षक फुलांनी श्रावणसरींमध्ये खुलून गेला आहे. त्यातूनच, या कातळांना सध्या ‘कास पठारा’चा नजारा चढला आहे. कातळीवरील डबकी आणि परिसरामध्ये सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांवर फुललेल्या फुलांनी निसर्गसौंदर्य खुलले आहे.
कातळावर पसरलेली पिवळी फुलांची चादरपाण्यात तरंगणारी वनस्पती ;निसर्गाच्या मुक्त उधळणीमध्ये सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्र किनारपट्टीच्या विविध भागातील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. राजापूर: तालुक्यातील जांभ्या कातळावर फुललेली निळ्या रंगासह अन्य रंगाची रंगीबेरंगी कास पुष्पे.पांढऱ्या ठिपक्याने पसरले चांदणे;कातळीवरील डबकी आणि परिसरामध्ये सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांवर फुललेल्या फुलांनी खुललेले निसर्ग सौंदर्य खुलले आहे.गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्यामध्ये काळी-तुळतुळीत आणि कोरडी दिसणारी कातळे आणि त्याचा परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजलाआहे.जांभ्या कातळावर निसर्गाने पांघरलेल्या रंगीबेरंगी, निळाशार चादरीचे सौंदर्य. सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांना कास पुष्पांच्या निळाशार रंगाच्या फुलांसह अन्य फुले आली आहेत.राजापूर : जैतापूरमार्गे गेलेल्या सागरी महामार्गावर रस्त्यानजीकचे कातळ, सोल्ये येथे कोकण रेल्वे थांबा परिसरात फुललेल्या या कासपुष्पांना पारंपारीक भाषेमध्ये त्यांना ‘सीतेची आसवे’ असेही म्हटले जाते.राजापूर: कोरीनअॅन्ड्रा इलिगन्स वनस्पतीची फुलेऊन-पावसाच्या खेळासोबत श्रावण महिन्यामध्ये कोकणचे निसर्गसौंदर्य चांगलेच नटले आहे. ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघलेली हिरवी शाल सार्यांचीच मने चांगलीच रिजवितात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.