Office Employee esakal
फोटोग्राफी

ऑफिसमध्ये स्वत:ला सिद्ध करायचंय? 'या' पाच टिप्स फॉलो करून पहा

उमेदवारांमधून नियोक्ता आणि व्यवस्थापकांना अशी प्रतिभा असलेली लोकं सहज ओळखता यायला हवी

सकाळ डिजिटल टीम

कामाच्या ठिकाणी जेव्हा तुमचे फ्रोफाईल दाखविण्याचा प्रसंग येतो, तेव्हा चांगले कर्मचारी नेहमीच त्यांचा स्मार्टनेस, उत्कृष्टता आणि जबाबदारी किती घेऊ शकतो हेच दाखवतो.

कामाच्या ठिकाणी (Office) जेव्हा तुमचे फ्रोफाईल दाखविण्याचा प्रसंग येतो, तेव्हा चांगले कर्मचारी (Employee) नेहमीच त्यांचा स्मार्टनेस, उत्कृष्टता आणि जबाबदारी किती घेऊ शकतो हेच दाखवतो. ते कंपनीला टीम लीड करण्याची वैशिष्ट्ये दाखवितात. त्यामुळे कंपनीचे मनोबल आणि उत्पादकता वाढू शकते. उमेदवारांमधून नियोक्ता आणि व्यवस्थापकांना अशी प्रतिभा असलेली लोकं सहज ओळखता यायला हवी, एक चांगला कर्मचारी असण्याची ही पाच लक्षणे आहेत.

स्वयंस्फूर्तीने पुढाकार (Volunteering) - एक चांगला कर्मचारी नेहमीच एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतो, अशा लोकांना आव्हाने आवडतात आणि ते नेहमीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार असतात. ही लक्षणे त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा आणि कठोर परिश्रम करण्याची इच्छा असल्याचे दाखवतात.
कंपनीची माहिती (Knowledge Aout Company)- चांगल्या कर्मचाऱ्याला कंपनीबद्दल पुरेसे ज्ञान असते. त्याला त्याच्या हुद्दा किंवा रोलविषयी व्यवस्थित माहिती असते, बाहेरच्या मार्केटविषयी व्यावसायिक जागरूकता असते. तसेच स्वत:ची कंपनी अता कुठे आहे याविषयी तो सजग असतो. इत्यांदी गोष्टींबाबात जागरूकता असल्यास त्याला त्याच्या कार्य संस्कृतीची चांगली समज असल्याचे दिसून येते.
सहकाऱ्यांशी आदरभाव (Colleagues look up to them)-चांगला कर्मचारी नेहमीच आपल्या सहकाऱ्यांचा आदर ठेवतो. त्यामुळे त्यांच्याविषयी सहकाऱ्यांत आदराची भावना असते. कामाच्या ठिकाणी त्याला एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. प्रत्येकजण त्यांच्या कौशल्याने प्रभावित होतो, जेव्हा सर्व कर्मचार्‍यांवर त्या एका कर्मचार्‍याबद्दल चांगली छाप असते, तेव्हा तो किंवा ती त्यांच्या कामासाठी खरोखर सक्षम आहे,हे लगेच दिसून येते.
अभिप्राय (Feedback)- स्वतःला सुधारण्यासाठी एक चांगला कर्मचारी नेहमी त्यांच्या व्यवस्थापकाकडून फीडबॅक घेतो. तुम्ही सध्या जे आहात त्यापेक्षा चांगले होण्यासाठी भरपूर वाव आहेत म्हणून, जो कर्मचारी नकारात्मक प्रतिक्रिया ऐकण्यास घाबरत नाही तो योग्य मार्गावर आहे, असे समजावे. चांगल्या प्रोफाइलच्या एकूण उभारणीसाठी रचनात्मक प्रतिक्रिया अत्यंत आवश्यक असतात.
प्रेरणा (Motivation) - एक चांगला कर्मचारी नेहमी इतरांना चांगले काम करण्यासाठी प्रेरित करतो. कर्मचाऱ्याने वाईट मार्गाने इतरांशी स्पर्धा करू नये. इतरांना सुधारण्यासाठी आणि कंपनीला सर्वोत्कृष्ट परिणाम मिळण्यासाठी प्रोत्साहित केल्याने साहजिकच कंपनीची कामगिरी आणखी चांगली होण्यास मदत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT