relationship between food and emotions Esakal
Food and Emotions: तुम्हाला जर खुप जास्त राग येतो का? तुम्हाला विनाकारण बेचैन वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष ठेवायला हवं. आयुर्वेदानुसार (Ayurveda) शाकाहारी किंवा मासाहारी (Vegetarian and Non-Vegetarian) आहाराचा तुमच्या वागण्यावर परिणाम होत असतो.
आयुर्वेदामध्ये आहार आणि भावनेचा संबंध सांगितला आहे.शाकाहारी आणि मांसाहारी आहाराचा परिणाम भिन्न असतो. आयुर्वेदानुसार आपल्या सर्वांमध्ये एक ऊर्जा असल्याचे सांगितलं आहे.
मांसाहार केल्यामुळे तुम्ही आक्रमक बनता तर शाकाहार करणाऱ्यांचं स्वतःवर जास्त नियंत्रण असतं.शाकाहाराने शरीरात सकारात्मक ऊर्जा येते असे आयुर्वेदात सांगितलं आहे. शाकाहारी पदार्थात फॅट कमी असतात. मांसाहारी जेवनामध्ये तेल आणि फॅट अधिक प्रमाणात असते. त्याचे दररोज सेवण केल्याने शरीरात चरबी जमा होते. शाकाहारी अन्नाद्वारे फायबर अधिक प्रमाणात मिळते.फायबरमुळे पचनास सुलभता येते, कफ होत नाही, तसेच पोट साफ होण्यासही मदत होते. ज्यांना जास्त राग येतो, त्यांनी शाकाहार करावा, असं आयुर्वेदात सांगितलं आहे. आयुर्वेदानुसार राग आणि निराशा उत्पन्न करणाऱ्या हार्मोन्सला कंट्रोल करता येऊ शकते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.