काही वेळा वैवाहिक जीवनातील नात्यात काही ठिकाणी थोडाफार दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येते. कधी कधी पती-पत्नीमध्ये खूप भांडण होते. हे भांडण मुलांमुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणांमुळेही असे घडते. तेव्हा या नात्यात दुरावा आल्याचे दिसून येते. कधी कधी भांडणात पतीकडून असे काही शब्द उच्चारले जातात ज्यामुळे पत्नीचे हृदय तुटले जाते आणि त्यामुळे त्यांच्या नात्यावर त्याचा परिणाम होतो. वादाच्या वेळी असे शब्द बोलण्यापासून स्वतःला रोखण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते.
तू दिवसभर काय करतेस? :
काही पुरुष त्यांच्या पत्नीला नकळत का होईना, बोलून टाकतात की, मी ऑफीस गेल्यानंतर तू दिवसभर काय करतेस? असे बोलताच ती म्हणते, एक दिवस मला घर सांभाळून दाखवा तर मी मान्य करेन. घरकाम करणे ही काही सोपी गोष्ट नाही. महिलांचा संपूर्ण दिवस स्वयंपाक बनवणे, झाडू, मॉप, कपडे धुणे इत्यादींमध्ये जातो. स्त्रिया देखील वरून मुलांपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेतात. अशा स्थितीत जेव्हा माणूस सायंकाळी घरी परततो तेव्हा तो अनेकदा प्रश्न विचारतो की, तुम्ही दिवसभर घरी काय करता? ही गोष्ट स्त्रियांना बाणासारखी टोचते कारण बाहेरच्या कामाची तुलना घरातील कामाशी होऊ शकत नाही.
जगाची समज नाही:
जेव्हा एखादा पुरुष अस्वस्थ असतो आणि अशा वेळी जेव्हा एखादी स्त्री त्याला काही सूचना देते किंवा समजून सांगतो तेव्हा तो तिला म्हणतो, गप्प बसं की तू, बाहेरच जग काय पाहिले आहेस किंवा तुला जगाची फारशी समज तर आहे का. ही गोष्ट महिलांना खूप त्रास देऊन जाते. स्त्रिया त्यांचा जास्तीत जास्त वेळ घरात घालवतात हे खरे आहे, याचा अर्थ त्यांना जग समजत नाही असे नाही. ते पुरुषांपेक्षा अधिक निर्णयक्षम आहेत आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत.
माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे तुमच्या कुटुंबातील सदस्य :
जेव्हा पती पत्नीच्या कुटुंबाचा आदर करत नाही, पत्नीच्या कुटुंबातील सदस्यांना समजत नाही असे तिला वारंवार सांगतो तेव्हा पत्नीचा स्वाभिमान दुखावतो. कारण पतीचे कुटुंब कोणतेही असो, पत्नी त्याला मनापासून स्वीकारते, त्यामुळे त्या बदल्यात पतीने आपल्या कुटुंबातील सदस्यांचा आदर करावा अशी पत्नीचीही अपेक्षा असते.
नेहमीच तु मनमानी करतेस:
हा काहींचा स्वतःचा अनुभव असू शकतो. काहींच्या तोंडून हे वाक्य बायकोसाठी जरुर येते ते म्हणजे 'तू नेहमीच स्वतःची मनमानी करतेस'. हे ऐकून तिचा राग सातव्या आसमानावर जातो. काही निर्णय घेऊन तिने काही केले तर ते फक्त आणि फक्त घर आणि मुलांसाठी करते. जे त्याच्या नजरेत अगदी ठीक असते. आणखी एक गोष्ट आहे जी आपण पुरुषांनी विसरू नये. स्त्री तिचे घर सोडते, नवऱ्याचे घर मनापासून स्वीकारते, त्या घराला सजवते, पण जेव्हा तिचा नवरा तिला सांगतो की ती नेहमीच तु मनमानी करते तेव्हा ती तुटते, कारण या घराच्या समृद्धीसाठी तिला याबद्दल बोलणे आवश्यक आहे. निदान थोडंफार पण स्वत:साठी वेळ काढत नाही. त्यामुळे नेहमीच तु मनमानी करतेस हे ऐकून ती पूर्णपणे तुटून जाते. प्रयत्न करूनही तुम्ही हे शब्द बायकोला बोलू नका.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.