Relationship Advice : कित्येकदा असे होते, आपला पार्टनर आपल्यासोबत मर्यादेपलिकडे निगेटिव्ह वागतो. छोट्या छोट्या गोष्टीवर रिअॅक्ट करणे आणि काही बोलले तरी भांडण करणे त्यांची सवय होऊन जाते. (How To Deal With A Negative Partner )
जर पार्टनर असेच निगेटिव्ह वागत राहिला तर गरजेची नाही की तुम्ही त्याच्यासोबत ब्रेकअप केले पाहिजे. तुम्हाला त्याला समजून घ्यायला हवे की त्यांना सुधारण्यासाठी काय करता येईल.रागामध्ये किंवा आरडा-ओरडा करुन रिअॅक्ट करू नका
जेव्हा तुमचा पार्टनर निगेटव्ह होतो, तेव्हा कित्येतदा ते तुमच्यासह बोलता बोलता आरडा- ओरडा सुरु करतात. तुमचा पार्टनरही असाच वागत असेल त्याच्यासह भांडण करण्याऐवजी त्याला समजविण्याचा प्रयत्न करा. कदाचित तो खूप चिंतेत असून शकतो आणि त्यामुळे त्याची छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल.पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्याचा प्रयत्न -
कित्येकदा असे होते, की, जेव्हा पार्टनर निगेटिव्ह होतो तेव्हा समोरच्याला समजून घेऊ शकत नाही अशा वेळी आपल्याला काय करावे समजत नाही. तुम्हाला खूप समजूतदारपणा दाखवायला हवा आणि प्रयत्न करा की वातावरण सकारात्मक राहिल याचा प्रयत्न करा. त्यांच्या आवडीची कोणतीही डिश बनवा जेणेकरून त्यांना जरा बरे वाटेल.
ऐकून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा
कित्येकदा पार्टनर सरळ बोलतच नाही, पण जर ते कोणत्याही पद्धतीने आपली चिंता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असलतील तर तुम्हाला त्यांचे ऐकुन घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तुम्हाला हे जाणून घ्यायला हे की त्यांना कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे, जेणेकरुन आपण त्यांची मदत करु शकतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.