नातेसंबंधांच्या बाबतीत, आईचे तिच्या मुलांशी सर्वात प्रेमळ आणि खरे नाते असते. मुलगा असो किंवा मुलगी, आई प्रत्येक मुलावर सारखेच प्रेम करते, परंतु मुलींशी त्यांचे नाते वेगळे असते. आईसाठी, तिची चांगली आणि जवळची मैत्रीण म्हणजे तिची मुलगी असते. मुलींच्या बालपणापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत आई त्यांची स्वप्ने जगत असते. मुलीचे संगोपन ही केवळ आईची जबाबदारी किंवा मातृत्व नसते, तर तिच्या माध्यमातून तिचे बालपण पुन्हा जिवंत करणे आवश्यक असते.
प्रत्येक आई, आपल्या मुलीला जगातील वाईट गोष्टींपासून दूर ठेवत असते आणि तिला उंचावर जाताना तसेच मोठे होताना पाहायचे असते. जर तुम्ही देखील आई असाल आणि तुमच्या मुलीबद्दल अशीच काळजी घेत असाल तर तुम्ही तुमच्या मुलीला मोठी झाल्यावर या चार गोष्टी सांगितल्या पाहिजे. जर मुलगी शाळेतून कॉलेजमध्ये आली असेल किंवा अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी घर आणि कुटुंबापासून दूर जात असेल तर तिला या चार गोष्टी नक्कीच समजून सांगा.मुलीला जबाबदारीची जाणीव करून द्या:
जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत तिला वडील आणि भावाचे संरक्षण मिळते. आईचा आशीर्वाद मिळतो. अशा परिस्थितीत, मुलीला तिच्या स्वतःबद्दलच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत. पण ती जेव्हा मोठी होऊन शाळेतून कॉलेज जीवनात येते तेव्हा तिची जबाबदारी काय असते हे सांगायलाच हवे. तुमच्या मुलीला सांगा की तिची स्वतःची सुरक्षा तिची पहिली जबाबदारी आहे. काहीही करण्यापूर्वी, स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करा.
मुलीचे मनोबल वाढवा:
आईनेही आपल्या मुलीला हे जाणवून द्यायला हवे की तिचा तिच्यावर किती विश्वास आहे आणि प्रत्येक योग्य पाऊलावर ती मुलीच्या सोबत आहेच. आयुष्याच्या नव्या प्रवासाला धैर्याने सामोरे जायला शिका. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कुटुंबाला, विशेषत: तुमच्या आईला जरूर सांगा, जेणेकरून एकत्र मिळून त्या संकटातून बाहेर पडू. याशिवाय कधी अपयशाला सामोरे जावे लागले तर कमजोर होऊ नका, तर यशासाठी पुन्हा प्रयत्न करायला शिका.काळजीपूर्वक मित्र निवडा:
मुलगी कॉलेज लाइफ जगते तेव्हा आईने तिला चांगले मित्र कसे ओळखायचे हे सांगणे आवश्यक आहे. चुकीचे मित्र निवडणे किती हानिकारक असू शकते? मुलीला योग्य मित्र बनवण्याचा सल्ला द्या, परंतु तिला निश्चितपणे सांगा की मित्रांची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. आपल्या मित्रांशी कसे वागले पाहिजे, याबद्दल ही तिला समजावून सांगा.
प्रेमाबद्दल बोला:
मुली जसजशा मोठ्या होतात तसतसे वयानुसार त्यांची एखाद्या विशिष्ट मित्राशी जवळीक वाढत जाणे स्वाभाविक आहे. तुमच्या मुलीच्या आयुष्यातही ब्रेकअप आणि क्रश येऊ शकतात. याबद्दल घाबरू नका, मुलीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा मित्रांप्रमाणे तुमच्या मुलीला या भावनांबद्दल काही महत्त्वाचा सल्ला द्या. त्यांना सांगा की आयुष्यात येणा-या किंवा जाण्याने जीवनात आणि अभ्यासावरही परिणाम होऊ देऊ नका.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.