How To Deal With Irritable Wife : लग्नांतर पती-पत्नीच्या नात्यामध्ये चढउतार येणे स्वाभाविक आहे. अशामध्ये नाते टिकविण्यासाठी तुम्हाला समजूतदापणा दाखवून आपल्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवू शकताता. पण कित्येकदा काही वाईट परिस्थितीमध्ये खूप ताण वाढला की, पार्टनरचा चिडचिडपणा (Irritable) वाढतो आणि अशावेळी त्यांना संभाळून घेणे अवघड होते. अशावेळी जर त्यांना इग्नोर केले तर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
विशेषत: जेव्हा तुमची पत्नी (Wife) प्रंचड तणावामध्ये असेल आणि तिचा स्वभाव चिडचिडा होत असेल तर अशावेळी तिच्या भावना (Feeling) समजून घेणे आणि काही गोष्टी फॉलो करून वाईट काळात त्यांना आधार देणे गरजेचे आहे. विश्वास (Trust )ठेवा, जर तुम्ही वाईट काळामध्ये पत्नीला आधार दिला तर तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास आणखी वाढेल. इतकेच नव्हे तर तर पत्नीचा चिडचिडा स्वभाव देखील कमी होईल. चला जाणून घेऊ या, चिडचिड्या पत्नाला कसे करावे हॅन्डल केले पाहिजे. (How to handle an irritable wife)
चिडचिड्या स्वभावाच्या बायकोला 'असे' करा हॅन्डल
१. चिडचिड्या स्वभावामागचे कारण
पत्नीचा स्वभाव चिडचिडा का झाला आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. कारण जाणून घेतल्यानंतर स्वत:ला प्रश्न विचारा, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? उत्तर हो असे असेल तर तुमच्या पत्नीला सॉरी बोलले पाहिजे. दुसरे काही कारण असेल तर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. 2. धीर धरा
तुमच्या पत्नीची सतत चिडचिड होत असेल तर अशावेळ थोडं धैर्याने घ्या. थोडं धीर धरून परिस्थिती निंयत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पत्नीचा चीडचडा स्वभाव कमी होईल.3.बाहेर घेऊन जा
कधी धी एकासारख्या रुटीमध्ये पत्नीचा स्वभाव खूप चिडचिडा होतो. अशावेळी पती म्हणून तुमची जबाबदारी असते की आठवड्यातून एकदा पत्नीला बाहेर घेऊन जा. फिल्म पाहणे, किंवा बाहेर जेवण करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे पत्नाचा चिडचिडा स्वभाव कमी होईलच त्याशिवाय मूड देखील चांगला राहील. ४. जबाबदाऱ्या वाटून घ्या
कित्येकदा पत्नीच्या मनामध्ये ही गोष्ट राहून जाते की घरातील सगळे काम केवळा ती एकटीच करते. अशावेळी तुम्ही तिला या गोष्टीची जाणीव करून द्या की, घरातील सगळ्या जबाबदाऱ्या फक्त तिच्या नाहीत, दोघांनी मिळून घर सांभाळले पाहिजे. अशावेळी तुम्ही आपल्या घरामध्ये अर्ध्याहून जास्त काम स्वत: केले पाहिजे आणि पत्नीसोबत घरातील काम पूर्ण करण्यासाठी मदत करा. ५. एकत्र वेळ घालवा
5. रात्री ऑफिसमधून घरी आल्यावर थोडा वेळ पत्नीसोबत वेळ घालवा. त्यामुळे पत्नीचा मूड चांगला होईलच आणि पत्नीसोबत चांगला वेळही घालविल्यामुळे तुम्हाला स्वत:ला एकटपणा जाणवणार आहेसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.