सध्या अनेकांना रिलेशनशिपमध्ये राहायला आवडते, तसेच प्रेमाच्या नात्यातही राहायचे असते. बऱ्याचदा असे दिसून येते की, जेव्हा लोक या नात्यात अडकतात तेव्हा ते खूप आनंदी असतात आणि प्रेमाने त्यांचे नाते पुढे नेण्यासाठी बरचं काही करतात. पण हे नाते कसे सुरू होते? वास्तविक, जेव्हा एखादा मुलगा मुलीला प्रपोज करतो आणि जर मुलीचा होकार असेल तर दोघेही रिलेशनशिपमध्ये येतात. पण बऱ्याच वेळा असे दिसून येते की मुली देखील मुलांना काही कारणांमुळे नकार देतात, पण तुम्ही कधी विचार केलाय का, मुलांच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मुलींना आवडत नाहीत? कदाचित तुम्हाला माहित नसेल ना, जर एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या सवयी सोडून द्याव्या लागतील ते जाणून घ्या.
स्मोक करणारी मुले:
काही मुलांना धूम्रपान करायला आवडते तर काहींना दारूचे सेवन. पण मुलींना अशा मुलांपासून लांब राहणे आवडते. सहसा मुली ड्रग्जच्या आहारी गेलेल्या मुलांपासून लांबच राहतात. म्हणूनच, तुमची ही वाईट सवय मुलींना इम्प्रेस करण्याच्या मार्गात अडथळा बनू शकते.अपमानास्पद वागणूक :
बऱ्याच मुलांना सवय असते की जेव्हा जेव्हा ते काही बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघतात. जरी, ते हे जाणूनबुजून करत नाहीत पण ही त्यांची सवय असते. मुलींना अपमानास्पद बोलणाऱ्या मुलांपासून दूर राहायला आवडते.साफ-सफाई करणारा :
अनेकदा असे दिसून येते की, मुले हॉस्टेलच्या खोलीत किंवा त्यांच्या घराच्या खोलीत क्वचितच स्वच्छता ठेवतात. खोलीत विखुरलेले सामान आणि अस्वच्छता देखील पाहावयास मिळते. एवढेच नाही तर ही मुले स्वतःचे कपडे, स्वतःचे केस इत्यादींकडेही लक्ष देत नाहीत, ज्यामुळे त्यांचा लूक चांगला दिसत नाही. त्याचबरोबर मुलींना अशा मुलांपासून दूर राहणे आवडते, जे स्वतःला स्वच्छ ठेवत नाहीत किंवा घरही स्वच्छ ठेवत नाहीत.
भांडणाची सवय:
बऱ्याच मुलांना सवय असते की ते भांडण आणि मारहाण करतात. त्यांच्या शाळेपासून ते कॉलेज किंवा इतर ठिकाणी ते भांडण करायला लाजत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच तुम्ही तुमची भांडण्याची सवय बदलायला हवी.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.