नागपूर : काही किलोमीटर धावल्यानंतर अनेकांना भूक लागते. परंतु, धावून खर्च केलेल्या कॅलरींवर खाऊन पाणी फेरता येत नाही. म्हणूनच अतिखाणे टाळण्यासाठी या भूकेची नेमक कारणे जाणून घ्यायला हवी. शरीराची गरज समजून घेतली की सगळे काही सोपे होते. चला तर जाणून घेऊ या भूक लागण्याचे कराण...
धावताना बऱ्याच कॅलरी खर्च झाल्याने शरीरातली ऊर्जा कमी होते. ऊर्जेची ही गरज भागवण्यासाठी शरीराला अन्नाची गरज लागते. म्हणून आपल्याला खूप भूक लागते.डाएट करणाऱ्यांना धावल्यानंतर खूप भूक लागू शकते. डाएट करणारे आधीच कमी कॅलरी घेतात. त्यातच धावल्यामुळे शरीरातल्या उरल्यासुरल्या कॅलरी खर्च होतात आणि शरीर अन्नाची मागणी करते.धावल्यानंतर अनेकांना भूक नाही तर लहान लागते. आपल्याला भूक लागली आहे का तहान, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. या गोंधळात काही लोक खूप खातात आणि डिहायड्रेट होतात. तसेच भूक पाण्याने मारणेही चुकीचे आहे. भूक आणि तहान यातला फरक ओळखायला शिका.अनेकांना मानसिक कारणांमुळे भूक लागते. आपण खूप धावलो त्यामुळे आता आपल्याला खायला हवे, असे विचार मनात आल्यामुळे प्रत्यक्षात भूक लागलेली नसतानाही खावसे वाटते.व्यायामाच्या प्रत्येक प्रकाराचा तुमच्या भूकेवर वेगळा परिणाम झाल्याचे पहायला मिळते.धावणे हा तीव्र स्वरुपाचा व्यायाम आहे. यामुळे प्रचंड कॅलरी खर्च होतात आणि भूक लागते. परंतु, प्रत्येक व्यायामप्रकाराच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. काही प्रकारच्या व्यायामांनंतर भूक मरते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.