Russia ukraine war 10 days Sakal
24 मार्च 2022 रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनवर हल्ले करून युक्रेनमधील अनेक ठिकाणांना उध्वस्त करुन टाकलं आहे. या युद्धाला आता दहा दिवस झाले आहेत. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे फक्त युक्रेनच नाही तर संपुर्ण जगाची चिंता वाढवली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या या दहा दिवसांमध्ये घडलेल्या दहा प्रमुख घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत.
24 मार्च 2022 रोजी रशियानं युक्रेनवर हल्ला (Ukraine Russia War) केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या किंमती मध्ये वाढ (Crude Oil Rates) झाली गेल्या सात वर्षांतील उच्चांक गाठला, तर जगभरातील अनेक शेअर बाजार कोसळल्याने अनेक गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झाले.
रशियानं केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र झेलेन्स्की यांनी एक व्हि़डीओ शेअर करुन आपण आपल्या कुटूंबासह युक्रेनमध्येच असल्याचं सांगितले होते.
26 फेब्रुवारी रोजी विटाली स्काकुन युक्रेनियन सैनिकानं रशियन सैन्याला क्रिमियात येण्यापासून रोखण्यासाठी एका पुलासह स्वतःला बॉम्बनं उडवल्याचं समोर आलं. क्रिमियन सीमेवरील खेरसन भागातील हेनिचेस्क पुलाच्या रक्षणासाठी विटाली शकुन तैनात होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कर्नाटकातील 21 वर्षीय नवीन खार्किव्ह युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता. आवश्यक साहित्य आणण्यासाठी गेला असताना रशियाने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाला25 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला. त्यानंतर संपुर्ण जगापुढची चिंता वाढली होती. 1986 मध्ये या ठिकाणी घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी युक्रेनमध्ये दाखल झालेलं एअर इंडियाचं विमान विमानतळ बंद असल्यामुळे माघारी परतलं. त्यामुळे समस्त भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली. युक्रेनधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारत ऑपरेशन गंगा राबवत आहे. यातून अनेक भारतीयांना मायदेशी आणलं गेले आहे. परंतु अजूनही सुमारे 7000 भारतीय युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे.
रशियाच्या प्रचंड लष्करी सामर्थ्यापुढे युक्रेनचे लष्करी बळ कमी आहे. त्यामुळे सैनिकांच्या सोबतीने नागरिकही युद्धात उतरत आहेत. त्यासाठी युक्रेननं त्यांना सैनिकी प्रशिक्षणही दिलं आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा राग युक्रेनियन नागरिकांच्या मनात असून युक्रेनचे नागरिक रशियाला विरोध करत आहेत. निशस्त्र युक्रेनियन नागरिक रशियन रणगाड्यांच्या समोर येऊन त्यांना रोखत आहेत.
रशियानं केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला.
रशियाने शहरातील खार्किव्ह शहरावर हल्ला केला. यामध्ये या शहराचं मोठं नुकसान झालं उध्वस्त झाले. रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ह (Kyiv) शहराला घेरले आहे. रशियन सैन्याचे याबाबतचे काही फोटो देखील समोर आले आहेत.रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनियन आजीनं रशियन सैनिकांना चांगलंच सुनावलं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.