नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या सुपरहिट चित्रपटात परश्याची भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसरने त्याच्या नव्या लूकमध्ये नुकतेच फोटोशूट केले आहे. त्याचे हे फोटो पाहून हा परश्या आहे की कबीर सिंगमधला शाहिद कपूर, असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
आकाशने मोनोक्रोम थीममधील हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या लूकमधील आकाशच्या हेअरस्टाइलने नेटकऱ्यांचं विशेष वेधून घेतलं आहे. डेनिम शर्ट आणि डेनिम पँट असा त्याचा हा लूक आहे. आकाशच्या नव्या फोटोशूटवर रिंकू राजगुरूनेही कमेंट केली आहे. 'ओह ठोसर' अशी कमेंट रिंकूने केली आहे. तर 'हा कोण आहे' असा प्रश्न अभिनेत्री हेमल इंगळेने विचारला. नव्या लूकमध्ये आकाश ओळखूनच येत नसल्याचं नेटकऱ्यांनीही म्हटलंय. आकाशने काही महिन्यांपूर्वीच '१९६२ : द वॉर इन द हिल्स' या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या सीरिजमध्ये त्याने भारतीय जवानाची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी आकाश आणि रिंकूने एकमेकांची भेट घेतली. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. 'बऱ्याच काळानंतर तुमच्या जुन्या मित्राला भेटण्याचा आणि मैत्रीत कोणताच बदल न झाल्याचा आनंदच निराळा आहे,' असं कॅप्शन रिंकूने या फोटोंना दिलं होतं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.