श्री हनुमानाने संजीवनी औषधीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्यातील काही पडलेला भाग म्हणजे जरंडेश्वर अशी अख्यायिका आहे. सातारा, कोरेगाव मार्गाच्या मध्यावर जरंडेश्वर पर्वत आहे. येथीला मारुतीची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामींनी केली आहे.
जरंडेश्वर येथे जाण्यासाठी वन विभागाच्या वतीनं पाय-या
बांधण्यात आल्या आहेत. त्याच्या दोन्ही बाजूला पक्ष्यांची माहिती देणारे फलक आहेत. हा डाेंगर चढताना दम लागल्यास बसण्यासाठी येथे आकर्षक लाकडी बाक ठेवण्यात आले आहेतजंरडेश्वरची खरीखुरी ओळख म्हणजे इथलं हनुमान डोंगरावर मंदीर. घडीव दगडांचं बांधकाम. प्रशस्त सभामंडप. संपूर्ण रंगकाम. संतांची चित्रे. महत्वाचे प्रसंग. मंदीरासमोर सुमारे ३०० वर्षांपूर्वीची दीपमाळ आहे.जरंडेश्वर हनुमान मंदिरश्री समर्थांनी स्थापलेली हनुमानाची मूर्ती.डाेंगरावर १०० किलो वजनाचा गुंड (गोल दगड ) उचलुन भाविक मंदिराभाेवती फे-या मारतात. पैलवान सचिन कदम (वळसेकर) यांनी हा गोल दगड उचलल्याचा क्षण.समुद्रसपाटी पासून सुमारे ३६५ मीटर उंचीचा डाेंगर चढताना आपल्या शारीरिक क्षमतेची एक परीक्षाच असते.
जरंडेश्वर मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी दर शनिवारी येणारी मंडळी आहेत. त्यातील काही 90 वयातली देखील आहे. सुमारे 1200 पायऱ्या न थकता चढतात आणि उतरतात त्यांचा उत्साह अनेकांना लाजवेल असा आहे.निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जरंडेश्वर डोंगर हे सर्वोत्तम स्थान आहे.जरंडेश्वर येथून दिसणारे विहंगम दृश्यब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.