Udayanraje Bhosale esakal
सातारा : ठाण्याची सायली पाटील (Sayali Patil) ही अवघ्या 10 वर्षाची मुलगी काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir to Kanyakumari) हा प्रवास सायकलवरून करत आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाव' हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली होती.यावेळी जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace Satara) येथे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सायलीचं स्वागत करून तिला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. सायलीच्या या धाडसीवृत्तीचं तोंडभरुन कौतुक करत उदयनराजे सायली पुढं नतमस्तक झाले.सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिनं आतापर्यंत 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून 1800 प्रवास शिल्लक आहे. राहिलेला प्रवास 18 दिवस पूर्ण करण्याचा सायलीचा मानस आहे. 23 व्या दिवशी ती साताऱ्यात पोहचली, तेव्हा तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.सायकलपट्टू सायलीला खासदार उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या असून फ्रान्स (France) येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलंय. (PHOTO : Pramod Ingale)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.