भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक प्राचीन आणि सर्वात प्रसिद्ध किल्ले आहेत. तर चला त्याविषयी जाणून घेऊ या..
लाल किल्ला - देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला आहे. तो मोगल बादशहा शहाजहाँने जवळपास १६३९ मध्ये बांधला होता.चित्तोडगड किल्ला - भारतातील सर्वात प्राचीन आणि पर्यटकांच्या पसंतीचा किल्ला म्हणजे चित्तोड किल्ला. हा किल्ला सातव्या शतकात चित्रांगद मौर्याने बांधले होते.
कांग्रा किल्ला - सर्वात प्राचीन आणि अद्भूत किल्ल्यांपैकी एक कांग्रा किल्ला. या किल्ल्याचा उल्लेख महाभारतातही आहे.गोवलकोंडा किल्ला - दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे गोवलकोंडा किल्ला. हा किल्ला हैदराबादेत आहे.
ग्वालियर किल्ला - सन १४८६-१५१६ च्या आसपास रजा मानसिंह तोमरने हा किल्ला बांधला होता.
जैसलमेर किल्ला - वर्ष ११५६ च्या आसपास बांधण्यात आलेला जैसलमेर किल्ला सुमारे ८०० वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. हा किल्ला रावल जैसल यांनी बांधला होता.पन्हाळा किल्ला - वर्ष ११७८ आणि १२०९ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या या किल्ल्याला मराठा, मोगल आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला सहभागी करण्याचे केंद्र मानले जाते.लाल किल्ला - देशाची राजधानी दिल्लीत लाल किल्ला आहे. तो मोगल बादशहा शहाजहाँने जवळपास १६३९ मध्ये बांधला होता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.