पाहा, माळशिरस तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळे Canva
अकलूजवरून महाळुंग 10 किलोमीटर तेथून रिक्षाने आनंदी गणेश आणि अकलूज परिसरातील किल्ले, मंदिर पाहू शकता. ही सर्व ठिकाणे पाहण्यासाठी एक दिवस राखीव ठेवणे गरजेचे आहे.
नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील (Malshiras Taluka) धार्मिक (religious Places) व पर्यटन स्थळांना (Tourist Places) दरवर्षी भाविक व पर्यटक आवर्जून भेट देत असतात. येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) आराध्य दैवत म्हणजेच शिखर शिंगणापूरचा (Shikhar Shingnapur) शंभू महादेव (Shambhu Mahadev), अकलूज (Akluj) येथील अकलाई देवी, शिव- पार्वती मंदिर, आनंदी गणेश मंदिर, महाळुंग येथील यमाई देवी, वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर, भाईनाथ महाराज समाधी मंदिर, माळशिरस येथील झोपलेला मारुती, मेडद व कारुंडे येथील काळभैरव, दहिगाव येथील जैन धर्मीयांचे भगवान महावीर मंदिर
शिंगणापूर येथील गुप्तलिंग मंदिर आदी स्थळांना भाविक व पर्यटक भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटतात. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागातील धार्मिक व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी अकलूजवरून महाळुंग 10 किलोमीटर तेथून रिक्षाने आनंदी गणेश आणि अकलूज परिसरातील किल्ले, मंदिर पाहू शकता. ही सर्व ठिकाणे पाहण्यासाठी एक दिवस राखीव ठेवणे गरजेचे आहे.
अकलाईमाता : अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी असून मंदिर व परिसर विस्तीर्ण व सुशोभित आहे. देवीची मूर्ती अतिशय सुबक असून दररोज सुवर्णालंकारांनी पूजा बांधण्यात येते. येथील नवरात्र महोत्सव प्रसिद्ध आहे. देवीची वार्षिक यात्रा आषाढ महिन्यात होते. शिव-पार्वती मंदिर : शंकरनगर येथील शिव-पार्वती मंदिर प्रसिद्ध आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. निसर्गरम्य वातावरण असल्याने मंदिर व परिसरात नेहमीच गर्दी असते. मंदिर देखणे असून मोठे आहे. मंदिरातील मूर्ती अतिशय विलोभनीय आहे. येथे लेसर शोची सुविधा आहे. आनंदी गणेश : मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून प्रसन्न आहेत. संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. आनंदी गणेश : आनंदनगर येथील श्री आनंदी गणेश व शिवमंदिर अलीकडील काळात निर्माण करण्यात आले आहे. निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात. श्रावण महिन्यात विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) : छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूरचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पठार आणि भवानी घाट सोलापूर जिल्ह्यात येतो आणि मुख्य मंदिर आणि गाव सातारा जिल्ह्यात. जिजाऊ मॉंसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे बंधू संभाजीराजे यांच्या जन्माच्या प्रीत्यर्थ मंदिराच्या समोर भव्य स्वागत कमान उभारलेली आहे, ती आजही चांगल्या अवस्थेत पाहण्यास मिळते. अर्धनारी नटेश्वर : वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मंदिरातील मूर्ती अतिशय सुबक व देखण्या आहेत. हे मंदिर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मंदिरासमोर मोठी बारव असून त्यामध्ये भरपूर पाणी आहे. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा संपन्न होते. मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात. श्रावण महिन्यात दर्शनासाठी विशेष गर्दी असते.भगवान श्री महावीर स्वामी : दहिगाव येथील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय क्षेत्र म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. श्री ब्रह्ममहतीसागर महाराजांनी हे क्षेत्र स्थापन केले. येथील भुयारी मंदिरे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत.शिखर शिंगणापूर येथील शिवलिंग.मेडद येथील रथोत्सव.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.