विद्यार्थिनींनी विविध वस्त्रप्रकार फॅशन शोमध्ये सादर केले.
औरंगाबाद : एमजीएम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगचा (आयएफडी) नुकताच क्लायडोस्कोप २०२१ या वार्षिक 'फॅशन शो' उत्साहात पार पडला आहे.
फॅशन डिझायनिंगच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्रांचे सादरीकरण दरवर्षी क्लायडोस्कोपमध्ये केले जात असते. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा हा फॅशन शो ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने झाला.शुक्रवारी (ता.३०) दोन वाजता विद्यार्थी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात प्रत्यक्ष फॅशन शो केले आणि इतरांसाठी त्याचे फेसबुक तसेच अन्य माध्यमांवरून प्रक्षेपण करण्यात आले. भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विव्हर्स सर्व्हिस सेंटरचे (नॉर्थ झोन) माजी संचालक बी.बी.पॉल या फॅशन शोचे प्रमुख अतिथी होते. प्रसिद्ध डिझायनर संदीप वर्मा (दिल्ली), उद्योजक, मॉडेल आणि अभिनेत्री दिशा परदेशी या शोच्या मुख्य परीक्षक होते.फॅशन शोची कोरिओग्राफी किजार हुसेन यांनी केले होते.फेरोह आर्क, इल्युजन प्ले, परशीयन कोबाल्ट, मेटामॉरफॉसिस, सारी युनियन हारबर ही यंदाच्या क्लायडोस्कोपची थीम आहे.या फॅशन शोमध्ये इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन आयफडीचे संचालक डॉ.मेघश्याम गुर्जर यांनी केले होते.यात आयएफडीच्या बीएफए, बी.डिझाइन आणि सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझाइन बुटीक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले ८६ वस्त्रांचे सादरीकरण केले.यंदा फॅशन शोवर कोविडचे सावट होते.यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.क्लायडोस्कोप २०२१ या वार्षिक 'फॅशन शो' उत्साहात पार पडला आहे. विविध वस्त्र प्रकार सादर करण्यात आले.एमजीएममध्ये क्लायडोस्कोप-२०२१ फॅशन शो मोठे उत्साहात झाला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.