नागपूर : भगवान राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५० कि.मी.वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे. त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. येथून आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. राम मंदिर परिसरातच एक विशाल नंदी आहे व श्रीगणेशाचे पुरातन मंदिर आहे. येथे श्रीरामाचे सेनागण म्हणजे वानरांचा मुक्त संचार आहे. नागपूरकर भोसल्यांच्या खास शस्त्रांचा साठा या मंदिरात आहे. मंदिरात कार्तिक महिन्यात येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा भरते. त्या रात्री १२ वाजता उंच कळसावर त्रिपुर प्रज्वलित केला जातो. संस्कृत काव्यातील एक अभिजात कलाकृती म्हणजे ‘मेघदूत’. कविकुलगुरू कालिदास यांनी हे काव्य याच रामटेक परिसरात लिहिले. सन १९७०-१९७१ मध्ये रामटेक गडमंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाने ‘कालिदास स्मारकाची’ निर्मिती केली. आज या कालिदासांच्या नावाने येथे संस्कृत विद्यापीठ सुरू आहे. (छायाचित्र - ललीत कनोजे) (See-the-beauty-of-the-fort-in-Ramtek-in-the-photos)
महाराष्ट्रातील (नागपूर) १,२०० वर्ष जुन्या मंदिराचे एक नाव कर्पूर बाळी असे आहे. कर्पूर म्हणजे कपूर आणि बावली म्हणजे पाण्याची टाकी. असे म्हणतात की विहिरीतील पाण्याला कापूर वास येतो आणि ते औषध म्हणून वापरले जात होते. हे रामटेक येथील मंदिरांपासून काही किलोमीटर अंतरावर एक प्राचीन बाओली आहे आणि तेथे एक जीर्ण मंदिर आहे. ज्यांना स्थानिकरित्या काली माता मंदिर म्हणून ओळखले जाते. कर्पूर बाओलीच्या एका टोकाला हे मंदिर आहे.कालिदास हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ. स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी (सध्याचे रामटेक) पर्वतावर येऊन राहू लागले अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून महाकवी कालीदासा यांनी ‘मेघदूत’ हे काव्य रचले.रामटेक तालुक्यात असलेल्या खिंडसी तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. नागपूरपासून ५३ किलोमीटर आणि रामटेकपासून ३.५ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. वैदर्भीय जनतेसाठी अनेक वर्षांपासून हे स्थळ आकर्षक आणि आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. येथे येणारे पर्यटक मोटरबोट्स, पेडल बोट्स, रोविंग बोट्स, वॉटर स्कूटर्स आदींच्या माध्यमातून जलतरणाचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांसाठी येथे साहसी पार्कही आहे. जंगलात ट्रेकिंगचीही सुविधा आहे.संस्कृतच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात कोणतेही विद्यापीठ नव्हते हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. १८ सप्टेंबर इ. स. १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या विद्यापीठाची स्थापना केली. संस्कृतमधील थोर कवी कालिदास यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले. कवी कालिदासांनी त्यांचे ‘मेघदूत’ हे काव्य रामटेक येथे लिहिले असल्याचे बोलले जाते. म्हणूनच या विद्यापीठाचे मुख्यालय रामटेक येथे आहे. विद्यापीठातर्फे संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागाअंतर्गत काम केले जाते. पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विद्यानिष्णात पदव्या प्रदान केल्या जातात.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.