Canva
फोटोग्राफी

पाहा, प्रत्येकाला सुखावणारी अक्कलकोटची धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळे

पाहा प्रत्येकाला सुखावणारी अक्कलकोटची धार्मिक व निसर्ग पर्यटनस्थळे

राजशेखर चौधरी

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र वास्तव्याने अक्कलकोटला मोठे धार्मिक महत्त्व आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुका (Akkalkot Taluka) हा तसा कायम दुष्काळी भाग आणि अर्थकारण दृढ करण्यासाठी सतत प्रयत्न करणारा आणि त्यातून बाहेर येण्यासाठी धडपड करणारा तालुका आहे. पण पर्यटन (Tourism) हे क्षेत्र असे आहे की त्यात तालुका हा बऱ्याच अंशी सदा भाविक व निसर्गप्रेमी नागरिकांनी बहरलेला असतो. अक्कलकोट तालुक्‍यातील सर्वांत महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र श्री स्वामी समर्थ मंदिर (Shri Swami Samarth Temple) असून, त्याच्या जोडीलाच विश्व फाउंडेशनचे शिवपुरी (Shivpuri) तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (Shri Swami Samarth Annachhatra Mandal) आदी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र वास्तव्याने अक्कलकोटला मोठे धार्मिक महत्त्व आहे. याचबरोबर अक्कलकोट येथील संस्थानकालीन इमारती व शस्त्रागार पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. याचबरोबरच कुरनूर धरण (Kurnoor Dam) व गळोरगी तलाव (Galorgi Lake) आदी निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. येथे देश-विदेशातून आलेल्या शेकडो पक्ष्यांचे तसेच रंगीबेरंगी फुलपाखरांचे वास्तव्य सतत असते. अक्कलकोटच्या चारही बाजूला जाणारे रस्ते देखील आता राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेले आहेत. यामुळे अक्कलकोट येथील धार्मिक व निसर्ग पर्यटन हे येथे येणाऱ्या प्रत्येकाला सुखावणारे ठरत आहे

अक्कलकोट शहरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ असून त्याची स्थापना 1988 साली झाली. वर्षभर सरासरी पंधरा हजारांपेक्षा जास्त भाविक येथे महाप्रसाद घेऊन तृप्त होतात.
अक्कलकोट संस्थान शस्त्रागार : नवीन राजवाडा मोठ्या दिमाखात संस्थानकालीन वारसा जपत उभा आहे. त्यात मौल्यवान शास्त्रागार आहे. अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे.
श्री काशीविशेश्वर देवस्थान जेऊर : अक्कलकोट शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर स्वयंभू काशीविश्वेश्वरांचे शिवलिंग आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वी बांधलेले हेमाडपंती मंदिर आहे. लिंगाभोवती असणारे अखंड पाण्याचे वलय आहे.
श्री जागृत मारुती मंदिर गौडगाव : अक्कलकोट तालुक्‍यातील गौडगाव येथे दक्षिणमुखी जागृत मारुती असून, अलीकडच्या काळात हे मारुती देवस्थान श्रद्धाकेंद्र बनले आहे.
ख्वाजा सैफुल मुलूक दर्गाह, हैद्रा : अक्कलकोट शहरापासून दक्षिण दिशेला तीस किलोमीटर अंतरावर हैद्रा हे गाव असून, तेथील सुमारे 555 वर्षांपूर्वी बांधलेले ख्वाजा सैफुल मुलूक यांचा दर्गाह आहे.
श्री संत धावजी बापू शांती स्थळ, डिग्गेवाडी : अक्कलकोट शहारापासून पाच किलोमीटर अंतरावरील डिग्गेवाडी येथे उद्योगपती किसनराव राठोड यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ संत धावजी बापू शांती स्थळ नावाने स्थान निर्माण केले आहे.
नवीन राजवाडा
शिवस्मारक
वटवृक्ष स्वामी मंदिर
शिवपुरी
गुरु मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT