Birla Mandir Canva
फोटोग्राफी

तेलंगणची राजधानी हैदराबादमधील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची भुरळ !

तेलंगणची राजधानी हैदराबादमधील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांची भुरळ !

श्रीनिवास दुध्याल

हैदराबाद हे शहर तेलंगण राज्याची राजधानी असून मुसी नदीच्या तीरावर वसलेले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हैदराबाद हे देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे.

हैदराबाद (Hyderabad) हे शहर तेलंगण राज्याची राजधानी असून मुसी नदीच्या तीरावर वसलेले आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हैदराबाद हे देशातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. येथे औषधनिर्माण, जैवविज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांनी आपले जाळे विणले आहे. विशेष आर्थिक क्षेत्र व हायटेक सिटीच्या निर्मितीनंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली कार्यालये हैदराबादला सुरू केली. या शहरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे जगप्रसिद्ध आहेत. (See the religious and tourist sites in Hyderabad, the capital of Telangana)

चारमिनार : हैदराबादचे नाव घेतले की, डोळ्यासमोर उभी राहते ती चारमिनारची प्रतिमा. ऐतिहासिक महत्त्व असणारी ही वास्तू हैद्राबादच्या वैभवात मोलाची भर घालते.
गोलकोंडा किल्ला : गोलकोंडा किल्ल्याची निर्मिती काकतीया राजवटीत झाली. त्यानंतर बहमनी साम्राज्यातही काही काळ हा किल्ला होता. कुतूबशाही साम्राज्याची राजधानी म्हणून गोलकोंडा किल्ला ओळखला जातो. ध्वनी परावर्तन हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य असून टाळी वाजवल्याचा आवाज एक कि.मी. अंतरावरही ऐकू येतो. भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे. प्राचीन काळी हिरे-जडजवाहीर यांचे खरेदी-विक्री केंद्र म्हणून गोलकोंडा किल्ला ओळखला जाई. कोलूर ही हिऱ्यांची खाण याच परिसरात असून जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा याच खाणीत सापडला व गोलकोंडा किल्ल्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आला होता.
सालारजंग म्युझियम : हैदराबाद शहरातील मुसा नदीच्या तीरावर दार-उल-शीफामध्ये हे संग्रहालय आहे. भारतातील प्रमुख तीन संग्रहालयांपैकी एक संग्रहालय म्हणून सालारजंग संग्रहालय ओळखले जाते. तसेच एका व्यक्तीने जमवलेल्या वस्तूंचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय म्हणूनही याचा नाव लौकिक आहे.
रामोजी फिल्म सिटी : जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती परिसर म्हणून रामोजी फिल्म सिटीचा नावलौकिक आहे. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन केंद्र व मनोरंजन स्थळ म्हणूनही रामोजी फिल्म सिटीला ओळखले जाते. एकावेळी 25 पेक्षा जास्त चित्रपटांचे चित्रीकरण या ठिकाणी चालते.
नेहरू झुलॉजिकल पार्क : हैदराबादमधील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या स्थळांमध्ये नेहरू झुलॉजिकल पार्कचा समावेश होतो. 300 एकर पेक्षा जास्त जागेत पसरलेल्या या पार्कमध्ये एक हजारपेक्षा पेक्षा जास्त वन्यजीव संरक्षित करून ठेवलेले आहेत. यामध्ये सिंह, वाघ, अस्वल, जिराफ, चिंपांझी, बिबट्या, मगरी, विषारी व बिनविषारी सापांचे असंख्य प्रकार, पक्ष्यांचे प्रकार पाहायला मिळतात. छोट्या आगगाडीतून या पार्कची भटकंतीही करता येते.
बिर्ला मंदिर : हुसेनसागर लेकच्या बाजूलाच उंच टेकडीवर बिर्ला मंदिर आहे. पांढऱ्याशुभ्र संगमरवरात तयार केलेले हे मंदिर दाक्षिणात्य बांधणीत असून, अत्यंत सुंदर दिसते. संगमरवरावर केलेले नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. या मंदिरात भगवान वेंकटेश्वराची मूर्ती असून ती हुबेहूब तिरुपती बालाजीच्या मूर्तीसारखी आहे. या मंदिराच्या परिसरातून हुसेनसागर लेक व हैदराबाद शहराचे मनोहारी दृश्‍य पाहायला मिळते.
मक्का मशीद : हैद्राबादचा सहावा कुतुबशाह सुलतान महमद कुतुबशाहने 400 वर्षांपूर्वी या मशिदीची निर्मिती केली. जवळजवळ 800 मजूर यासाठी वापरले गेले. तीनमजली रचना असलेली ही मशीद एका अखंड शिलाखंडातून कोरून तयार केलेली आहे.
हुसेनसागर : 1562 पासून हुसेनसागर तलाव हैदराबाद आणि सिकंदराबाद या जुळ्या शहरांना सजवत आहे. एक पर्यटन स्थळ ज्याला कुटुंबासमवेत भेट देता येईल. आजूबाजूच्या भोवतालचा परिसर आनंददायी वाटते.
लुम्बिनी पार्क : पर्ल्स सिटीच्या मध्यभागी वसलेले लुम्बिनी पार्क हे एक आधुनिक शैलीचे शहरी उद्यान आहे जे हैदराबादमधील पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या पार्कमध्ये नेत्रदीपक लाईट व साऊंड शोदेखील आहेत, जे लोकांच्या आकर्षणांपैकी एक आहे. भगवान बुद्धाला हे उद्यान समर्पित आहे आणि नेपाळच्या लुम्बिनी येथील त्यांच्या जन्मस्थळाचे नाव देण्यात आले आहे. हुसेन सागर तलावावरील उद्यानाजवळ बुद्धाचा एक विशाल पुतळा आहे. उद्यानातूनच पुतळ्याकडे जाण्यासाठी पर्यटक बोट घेऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT