अभिनेत्री अंकिता लोखंडे (Actor ankita Lokhande) आणि विक्की जैन हे ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अंकिताच्या चाहत्यांना देखील या दोघांची जोडी आवडते. अनेक चाहते दोघांनीही लग्न करावे (ankita lokhande marriage), अशी इच्छाही बोलून दाखवितात. आता कलाकार शाहीर शेखने तिच्या लग्नाबद्दल एक गुपित सांगितलं आहे.
अंकिता विक्कीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तू सर्वात चांगला जोडीदार आहेस, त्याबद्दल तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असंही ती अनेकदा म्हणते. काही दिवसांपूर्वी अंकिता म्हणाली होती, ‘लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे. होय, मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्साहीत आहे आणि मला जयपूर-जोधपूर अशा ठिकाणी राजस्थानी पद्धतीने लग्न करायला आवडेल. पण मी अजून काय करायचं हे ठरवलं नाही.’शाहीर आणि अंकिता त्यांच्या आगामी शो ‘पवित्र रिश्ता 2’चे प्रमोशन करत आहेत. तर, अलीकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत, मालिकेनंतर अंकिता पुढे काय करणार? असा प्रश्न विचारणार आला. त्यावर यानंतर कुठलाच शो नाही, असं अंकिता म्हणाली. पण, मध्येच 'तू तर लग्न करत आहेस', असं शाहीर बोलला.शाहीरने लग्नाची गोष्ट काढताच अंकिता चिडली आणि ‘तू वेडा आहेस का? गप्प बस… नाही नाही असे काही नाही' असे म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शाहीरनेही त्याची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. अंकिता आणि विक्की यांनी लग्न केल्यास ही चाहत्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर असेल. आता शाहीरने म्हटल्याप्रमाणे, आता खरंच अंकिता अन् विक्की जैनचं लवकरच लग्न होणार का? अशी उत्सुकताही तिच्या चाहत्यांना लागली आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.