Shankarrao Gadakh And Chandrashekhar Ghule Family esakal
अहमदनगर जिल्ह्यात गडाख व घुले पाटील ही दोन्ही मोठी राजकीय घराणी आहेत. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डाॅ.निवेदिता यांचा साखरपुडा झाला.
अहमदनगर येथील गडाख यांच्या विरंगुळा या निवासस्थानी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत थाटात हा सोहळा पार पडला.युवा नेते व मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन हे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे नातू, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांचे चिरंजीव आहेत.डाॅ.निवेदिता या जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांची कन्या, माजी आमदार नरेंद्र घुले यांची पुतणी तर शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षीतिज घुले यांची चुलत बहीण आहेत.नेवासा तालुक्यातील दोन साखर कार कारखानदारांना जवळ करणारा हा साखर पुडा नेवासा विधानसभा मतदारसंघात गोडी निर्माण करणारा ठरला आहे. उदयन यांचे मामा राहुल राजळे व डाॅ.निवेदिता यांचे मामा संजय यादव यांनी सुपारी फोडताच उपस्थित नातेवाईकांनी टाळ्यांचा गजर केला. अहमदनगरमधील यशवंत काॅलनीतील गडाख कुटुंबाच्या विरंगुळा बंगल्यात फुलांची सजावट करण्यात आली होती.जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहितात, की माझा मुलगा चिरंजीव उदयन आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची कन्या चि.सौ.का.डॉ.निवेदिता यांच्या साखरपुडा कोरोनाच्या निर्बंधांमुळे घरगुती स्वरूपात छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रम आज संपन्न झाला. आपले प्रेम व आशीर्वाद या उभयतांच्या पाठीशी असावेत.या प्रसंगी ज्येष्ठ नेते यशवंत गडाख, उद्योजक विजय गडाख, माजी आमदार पांडूरंग अभंग, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्यासह मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
अहमदनगरमधील यशवंत काॅलनीतील गडाख कुटुंबाच्या विरंगुळा बंगल्यात फुलांची सजावट करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.