झी मराठी वाहिनीवरील 'पाहिले न मी तुला' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकरने खलनायकी भूमिका साकारली. ही मालिका संपत असताना शशांकने सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'शेवटी समरसारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच. पाहिले न मी तुला, आणखी एक अत्यंत वेगळं प्रोजेक्ट माझ्या वाट्याला आलं. प्रोजेक्ट जरी लवकर संपलं असलं तरी या मालिकेमुळे झालेली मैत्री, अनेक आठवणी आणि खलनायकाची भूमिका करण्याचा अनुभव, सगळंच आयुष्यभरासाठी मिळालं,' अशी पोस्ट शशांकने लिहिली.
या पोस्टद्वारे शशांकने कोठारे व्हिजन, आदिनाथ कोठारे, झी मराठी आणि सर्व प्रेक्षकांचे आभार मानले.
'प्रेक्षकांनी समरच्या वागण्यावरचा व्यक्त केला पण माझ्या भूमिकेचं, कामाचं कौतुकही केलं. पुन्हा एकदा धन्यवाद, भेटुया लवकरच', असं त्याने लिहिलं.
२०१३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतून शशांक घराघरात पोहोचला.
त्यानंतर शशांकने पाहिले न मी तुला या मालिकेतून पुनरागमन केलं. या मालिकेत शशांकने पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारली आहे.
शशांकसोबतच यामध्ये अभिनेता आशय कुलकर्णी आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.