Sheefali Shah Bollywood Actress
ह्युमन' अभिनेत्री शेफाली शाहने अलीकडेच तिच्या आयुष्यातील एका कठीण काळाबद्दल खुलासा केला जेव्हा तिला तिच्या सासरच्या लोकांकडून लैंगिकतेचा अनुभव आला.
"मी ही परंपरागत विचारसरणीची बळी ठरली आहे. मी घरात विशेषत: सासरच्या घरात स्वत:शी भेदभाव होताना पाहिला आहे." याचा खुलासा अभिनेत्री शेफाली शाह हिने केला आहे. खरं तर, एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीला विचारण्यात आलं होतं की, तुमचं मत व्यक्त करण्याच्या तुमच्या सवयीने तुम्हाला कधी अडचणीत टाकलं आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शेफाली शहा म्हणाली, ''हो, मी माझे मत व्यक्त करते, पण मी बोलत असताना तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करते.''शेफाली पुढे सांगते की, मी मोठी होत असताना आईचे म्हणणे किंवा आई-वडिलांचे म्हणणे पाळले. मी त्यांच्या शिकवणीवर किंवा त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर शंका घेतली नाही. पण, प्रत्येक मुद्द्यावर मत मांडणाऱ्या आजच्या तरुणाईने मी प्रभावित झाले आहे.अभिनेत्री म्हणते की,''मला माझ्या सासरच्यांमध्येही लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागला आहे. मला आठवतं, माझा पती विपुल जेव्हा शूटसाठी जातो तेव्हा साहजिकच कोणी प्रश्न विचारत नाही, पण जेव्हा मी सतत शूटिंग करत असते तेव्हा सगळेच प्रश्न विचारू लागतात. म्हणे, 'पुन्हा शूटला जावं लागेल?' आणि माझी प्रतिक्रिया असते की, 'खरंच? मला हा प्रश्न विचारला जातोय?' कधी-कधी ते म्हणतात, 'इतके तास शूटिंग करतेस?' अरे पण, काम असेच आहे, हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलाला का विचारत नाही?''अभिनेत्री पुढे म्हणते, "मी माझ्या घराची चांगली काळजी घेऊ शकते-"स्वयंपाक करणे, साफसफाई करणे, भांडी धुणे, झाडू मारणे, मॉपिंग करणे, कपडे... मी सर्वकाही करू शकते. मला आठवतं एकदा विपुल भांडी धुत होता. माझ्या सासूबाई त्याच्या मागे उभ्या होत्या आणि मला आठवतंय त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या, 'एवढा मोठा दिग्दर्शक भांडी घासत आहे. मला खूप वाईट वाटत आहे. आणि मनातल्या मनात विचार करू लागल्या.' अभिनेत्री भांडी धुतीये, हा विचार कधीच येणार नाही. तो उत्तम दिग्दर्शक आहे, त्यात काही वाद नाही, पण त्याचा घराशी काय संबंध?"शेफाली शाहच्या कारकिर्दीतील मागील वर्ष हे तिच्या करीअरचे सर्वोत्कृष्ट वर्ष ठरले. शेफाली शाह आलिया भट्ट आणि विजय वर्मा अभिनीत डार्लिंग्स आणि दिल्ली क्राइमच्या दुसऱ्या सीझनच्या रिलीजची वाट पाहत आहे. डॉक्टर जी आणि जलसा या चित्रपटातही ती दिसणार आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.