फोटोग्राफी

Uddhav Thackrey: धीर सोडू नका, खचू नका... उद्धव ठाकरेंनी बांधावर जात घेतली शेतकऱ्यांची भेट

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. त्यांनी नुकतीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या औरंगाबाद गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार येथे पाहणी केली.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेत त्यांना धीर दिला. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सहकार्य केले जाणार आहे, असे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
"जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्ही काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली. अर्थव्यवस्था ठप्प असताना तुम्ही राज्याचे अर्थचक्र चालवलं.
शेतीने आपल्या अर्थव्यवस्थेला सावरलं, त्यामुळे तुम्ही आता धीर सोडू नका, खचून जाऊ नका, आपण मदत द्यायला सरकारला भाग पाडू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत उद्धव ठाकरे यांनी शेतकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर देत मी तुमच्यासोबत आहे म्हणत शेतकऱ्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांनी संघटित व्हायला हवं त्याचबरोबर सुडाने पेटून उठा. मी कायम तुमच्या सोबत आहे. तुमचा आवाज बनून सरकारसमोर जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव समोर ठेवेल असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. ते सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
शिवसेनेत शिंदे गटाने केलेल्या बंडानंतर आणि राज्यात झालेल्या सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
विशेष म्हणजे हा दौरा ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी केला असल्याने, सत्ताधारी यांना घेरण्याचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे आजारी असतांना देखील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आज नुकसानग्रस्त भागात पोहचले आहे.
माझ्या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळाली पाहिजेल. भावनांचा दुष्काळ आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर नाही. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT