नाशिक : श्रावण कृष्णाष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता. ३०) कापड बाजारातील मुरलीधर मंदिरासह द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री अकरा ते बारादरम्यान जन्माष्टमीचा पाळणा झाल्यावर बारा वाजता जन्मोत्सव साजरा होईल.
भगवान श्रीकृष्ण म्हणजे चिमुकल्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वाचे लाडके दैवत. शहरात श्रीकृष्णाची मंदिरे तुरळक आहेत. कापड बाजारात असलेल्या शहरातील एकमेव जुन्या मुरलीधर मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सकाळी नऊ ते बारा या वेळेत मुरलीधराला पंचसुक्त पवमान अभिषेक करण्यात आले.त्यानंतर दिवसभर विविध भजनी मंडळे नित्यसेवा सादर करण्यात आले. रात्री आठ वाजता देवाचा पाहरा (भजनसंध्या) कार्यक्रम पार पडेल. अकरा ते बारापर्यंत जन्माचे कीर्तन झाल्यावर बारा वाजता जन्मोत्सव साजरा होईल. प्रशासनाच्या आदेशाने भाविकांना प्रवेश नसल्याने केवळ पुजारी वर्गांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडणार असल्याने भाविकांना त्याची अनुभूती ऑनलाइन स्वरूपातच घ्यावी लागेल, अशी माहिती संदेश संत यांनी दिली. द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिरात गोकुळाष्टमी महामहोत्सवाचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात करण्यात आले आहे. जन्मोत्सवाच्या निमित्ताने गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवाची सांगता होईल. मंदिरात पहाटे पाच वाजता श्रींची मंगल आरती, सकाळी साडेआठ वाजता ब्रजविहारी यांची श्रीकृष्णकथा, दुपारी साडेतीन ते पाच यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम. सायंकाळी पाच ते साडेसहा पुन्हा श्रीकृष्ण कथा, सायंकाळी साडेसहाला राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन झाल्यावर अभिषेक , महाआरती कार्यक्रम होईल मध्यरात्री बारा वाजता जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या सोहळ्याची अनुभूती यू ट्यूबमार्फत घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.