shri vitthal rukmini temple in pandharpur is decorated with threecolor flowers esakal
पंढरपूर (सोलापूर) : भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडू, शेवंती आणि कामिनी अशा तिरंगी फुलांची आणि पानांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.
तिरंगी आराशीमध्ये सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. पुण्याच्या सचिन आण्णा चव्हाण, संदिप वि.पोकळे, विक्रम भुरुक, राहुल ब.पोकळे, संतोष ल.पोकळे आणि भोलेश्वर पोकळे या विठ्ठल भक्तांनी आजच्या सजावटीसाठी सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत.विविध सण आणि राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांनी आणि त्या त्या काळात उपलब्ध असणाऱ्या फळांनी सजावट केली जाते. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज मंदिरात तिरंगी आरास करण्यात आली आहे.
तिरंगी सजावटीमुळे सावळ्या विठूरायाचे रुप आज अधिकच खुलून दिसत आहे. पुण्याच्या सचिन आण्णा चव्हाण, संदिप वि.पोकळे, विक्रम भुरुक, राहुल ब.पोकळे, संतोष ल.पोकळे आणि भोलेश्वर पोकळे यांनी सुमारे 35 हजार रुपये खर्च करुन आजच्या सजावटीसाठी सुमारे 750 किलो फुले उपलब्ध करुन दिली आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन देखील विठूरायाच्या मंदिरातील तिरंगी सजावट भाविकांना पाहता येत आहे. शिंदे ब्रदर्स साई डेकोरेटर्स पंढरपूर यांनी आरास डेकोरेशनचे काम केले आहे.कोरोनाच्या सावटामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन रांग दररोज रात्री साडे आठ वाजता बंद करुन रात्री नऊ वाजता मंदिर बंद केले जात आहे. तथापी भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.