valuable things of Dr. Babasaheb Ambedkar) Sakal
शोषित, पिडीत आणि वंचितांना न्याय हक्क मिळवून देणाऱ्या घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीला मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात सुरक्षित जतन करून ठेवण्यात आले आहे. हा ऐतिहासिक ठेवा असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सिद्धार्थ महाविद्यालय सांगतं. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेकवेळा संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांच्या अनमोल साहित्याचा ठेवा पाहण्यासाठी उपलब्ध केला जातो. (Siddharth College has preserved valuable items and things of Dr. Babasaheb Ambedkar)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहील्यानंतर संविधानाच्या मूळ प्रती घटना समितीच्या सदस्यांना देण्यात आल्या होता. दरम्यान बाबासाहेबांनी त्यांची मूळ प्रत सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट म्हणून दिली होती. त्यावेळी शां.श.रेगे नावाचे ग्रथंपाल होते. त्यांच्या निवृत्तीनंतर श्रीकांत तळवलकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत आणि साहित्यांच्या अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. ज्यामध्ये बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची लहान मुळ प्रत आणि एक मोठी प्रत अद्यापही सिद्धार्थ महाविद्यालयात बघायला मिळते.
डॉ.बाबसाहेबांच्या पावनपद स्पर्शाने पुनीत झालेल्या महाविद्यालयात त्यांची खुर्ची सुद्धा जपून ठेवण्यात आली आहे. याच खुर्चीवर बसून अनेक पुस्तक आणि कायद्याचे वाचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे महाविद्यालयातील जुने जाणते सांगतात.
त्याशिवाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले अत्यंत दुर्मिळ ग्रंथ, नोट्स अद्यापही ग्रंथालयात बघायला मिळतात.त्यापैकी काहींवर बाबासाहेबांच्या शाईच्या पेनाच्या स्वाक्षरी सुद्धा आहेत.
यातील अनेक पुस्तक आणि साहित्य महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाला दिले असून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन यांनाही प्रकाशित करण्यासाठी अनेक ग्रंथ साहित्य देण्यात आल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मोहिते सांगतात.
अखबराच्या नऊ रत्नांपैकी एका रत्नाचे हस्तलिखीत ग्रंथ सुद्धा सिद्धार्थ महिविद्यालयात पाहायला मिळतात. शिवाय त्यांच्या हिंदीतील कविता आणि संस्कृत वाक्यांचा हिंदी अर्थ करण्यात आल्याचे हस्तलिखीत लिखान सुद्धा बघायला मिळतेSakalयाबाबत सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य अशोक सुनतकरी सांगतात की, "बाबासाहेबांची अनेक दुर्मिळ पुस्तके सिद्धार्थ कॉलेजच्या ग्रंथालयात आहे. त्याच बरोबर त्यांची हस्तलिखिते, हिंदी काव्ये, टाचणे, उतारे इ. आमच्याकडे आहेत. यातील बरेच साहित्य आम्ही शासनाला दिले असून यातील बरेच साहित्य शासनाने प्रकाशित केले आहे.आमच्याकडे अनेक लोक संदर्भ ग्रंथासाठी येतात.देशा परदेशातून अभ्यासक येतात. अनेक मोठमोठ्या लेखकांनी आमच्या ग्रंथालयालाचा उल्लेख सन्मानाने केला आहे."
"संविधानाची मुळ प्रत फारच अनमोल ठेवा आहे. त्याला सुरक्षीत ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. ग्रथंपाल असतांना व्यवस्थापनाकडे त्याला काचेचे आवरन असलेल्या ठिकाणी सुरक्षीत ठेवण्याचे सुचवले होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे करता आले नाही. मात्र, आता पुन्हा व्यवस्थापनाकडे मागणी करणार आहे," असं सिद्धार्थ कॉलेजचे निवृत्त ग्रंथपाल श्रीकांत तळवरकर यांनी म्हटले आहे.
हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी देशविदेशातील अनेक लोक येत असतात. हा ठेवा वेळोवेळी लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध केला जातो. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.