Sambhajiraje Chhatrapati esakal
कोल्हापूरच्या खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा साधेपणा आपल्याला वेळोवेळी पहायला मिळतो. कधी शेतामधील औतावर बसून जेवण, कधी जामखेड (Jamkhed) येथील निवारा बालगृहातील मुलांसोबत जेवण, तर कधी स्टॉलवरती कोकम सरबतचा आस्वाद घेताना राजे पहायला मिळतात.
कोल्हापूरच्या खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा साधेपणा आपल्याला वेळोवेळी पहायला मिळतो. कधी शेतामधील औतावर बसून जेवण, कधी जामखेड (Jamkhed) येथील निवारा बालगृहातील मुलांसोबत जेवण, तर कधी स्टॉलवरती कोकम सरबतचा आस्वाद घेताना राजे पहायला मिळतात. राजघराण्यातील वारसदार असतानाही त्यांच्या अंगी कमालीचा साधेपणा आहे. ते कधीच राजेशाहीचा बडेजाव मिरवत नाहीत. याची प्रचिती वेळोवेळी अनुभवायला मिळत असते.6 ऑक्टोबर 2021 : सोलापुरातील (Solapur) पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी येत असताना वाटेत पावसामुळं झालेलं शेतीचं नुकसान दिसत होतं. यावरूनच मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतीचं किती नुकसान झालं असेल, याचा अंदाज येत होता. सोलापुरातील कार्यक्रम संपताच लगेचच पुढं जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करू, असं वाटेतच ठरवलं.6 ऑक्टोबर 2021 : उस्मानाबाद जिल्ह्यातील विष्णू इंगळे, रोहित पडवळ या सहकाऱ्यांना सूचना केल्या व सोलापूरमधील कार्यक्रम आटोपताच नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी रवाना झालो. उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपूर, इरळा, रामवाडी, काजळा या नुकसानग्रस्त गावांस भेट दिली. सलग दुसऱ्या वर्षी अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं हातचं पीक वाया गेलंय, असं म्हणत संभाजीराजेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत व भरपाई मिळून त्यांचं जीवनमान पूर्वपदावर यावं, यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबध्द असल्याचं सांगितलं आणि त्यांच्या पाठिशी उभे राहिले.22 ऑक्टोबर 2021 : दुर्गराज रायगड.. (Durgaraj Raigad) श्री शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी आणि माझ्यासारख्या प्रत्येक शिवभक्तांचं ऊर्जास्थान! गडावर सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांची पाहणी करण्याच्या निमित्तानं नेहमीच रायगडला भेट देत असतो; पण खरोखर ते एक निमित्तच असतं. रायगडाप्रती असलेली आंतरिक ओढच आपल्याला गडाकडं खेचत असते. प्रत्येक ऋतूत रायगड वेगळा भासतो. उन्हाळ्यात स्थितप्रज्ञ राकट असणारा रायगड पावसाळ्यात संपन्न, पण तितकाच रौद्र वाटतो, तर हिवाळ्यात रायगडाची संपन्नता मनाला प्रसन्नता देणारी असते. प्रत्येकवेळी रायगड नव्यानं दर्शन देतो, या गडाच्या भेटीदरम्यान संभाजीराजेंनी आपली भावना व्यक्त केलीय.31 ऑक्टोबर 2021 : या दिवशी दुर्गराज रायगडला भेट दिली. गडावर सुरू असणाऱ्या प्राधिकरणाच्या सर्व कामांची पाहणी केली. उनही भरपूर होतं. बाजारपेठेच्या मागे असणाऱ्या फुटक्या तलावाची पाहणी करून वरती येत असताना स्थानिक भगिनीच्या स्टॉलवरती सहकाऱ्यांसमवेत कोकम सरबतचा आस्वाद घेतला. गडावर स्थानिकांची अनेक दुकानं आहेत व हेच त्यांच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे.31 ऑक्टोबर 2021 : पुरातत्त्व विभागाकडं नोंदणीकृत असणाऱ्या गडावरील दुकानांचा रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कायापालट केला जाणार आहे. याला शिवकालीन ऐतिहासिक स्वरूप देऊन गडाला साजेशा रूपात बदल करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरू झालेली असून, ऐतिहासिक धाटणीची ही दुकानं गडाच्या सौंदर्यास साजेशी असतील. या दुकानांमध्ये स्थानिक पदार्थांच्या विक्रीवर अधिक भर दिला जाईल. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे कसा टाळता येईल, याकडंही लक्ष असणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं.19 ऑगस्ट 2021 : नांदेड येथील मराठा क्रांती मूक आंदोलनासाठी जात असताना मार्गात जालना जिल्ह्यातील रामनगर येथील ग्रामस्थांनी संभाजीराजेंचं उत्साहात स्वागत केलं. याठिकाणी आसपासच्या गावांतील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी 'काठी अन् घोंगडं' देऊन ग्रामस्थांनी राजेंचा अनोखा सत्कार केला.2 जुलै 2021 : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना दुपारचं भोजन जामखेड येथील निवारा बालगृहातील मुलांसोबत केलं. भटक्या विमुक्त जाती, लोककलावंत, ऊसतोड मजूर, वीटभट्टी कामगार अशा समाजातील दुर्लक्षित घटकांतील मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेमार्फत हे बालगृह सुरू करण्यात आलेलं आहे.2 जुलै 2021 : राजर्षी शाहू छत्रपती महाराज (Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj) व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) विचारांचा वारसा या संस्थेमार्फत समर्थपणे चालविला जात आहे. बालगृहातील चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहानं स्वागत केलं. त्यांच्यासोबत भोजन करताना एक वेगळेच समाधान लाभलं, असं संभाजीराजे म्हणाले.14 जून 2021 : कोल्हापुरात (Kolhapur) पावसानं जोर धरल्याने येथील पेरणीच्या कामांना वेग आला होता. भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती स्वत:च्या शेतातून घरी येत असताना त्यांना आजूबाजूच्या शेतातील पेरणीची कामं सुरू असलेली दिसली. हे दृश्य पाहून त्यांना रहावलं नाही आणि त्यांनी चक्क शेतात जाऊन तिफनी ओढली. मात्र, तोंडाला मास्क लावलेलं असल्यानं त्यांचा श्वास फुलल्यानं त्यांनी मास्क काढून तिफनी ओढली.12 जून 2021 : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौऱ्यावर होते. त्यांनी अहमदनगरमधील (Ahmednagar) कोपर्डीला भेट दिली. यावेळी प्रवासाच्या दरम्यान संभाजीराजेंचा साधेपणा पाहण्यास मिळाला. रस्त्याच्या बाजूला थांबून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेनं रवाना झाले. या दौऱ्यातही त्यांचा साधेपणा दिसून आला.3 जानेवारी 2022 : या सकाळी विसापूर किल्ल्याच्या चढाईसाठी गडपायथ्याला येताच, तिथं बोरडे कुटुंबीयांना आमच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था सांगून गडावर गेलो. गड पाहून दुपारी बोरडे यांच्या अंगणातील रम्य झाडीत बसून जेवण केलं. अत्यंत आपुलकीनं केलेलं अस्सल गावरान पद्धतीच्या जेवणानं मन अगदी तृप्त झालं. यानंतर किल्ले विसापूरला (Visapur) लागून असलेल्या लोहगडची चढाई करण्यासाठी सज्ज झालो, असं खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं. 3 जानेवारी 2022 : अमोल बोरडे व कुटुंबीय हे इथले स्थानिक रहिवासी आहेत. गडपायथ्याला ते घरगुती भोजनगृह चालवितात. गड पहायला येणाऱ्या शिवभक्तांना, पर्यटकांना पोटभर जेऊ घालणं, हेच त्यांच्या उपजिवीकेचं साधन आहे. पर्यटकांना गडाबरोबरच इथल्या स्थानिकांच्या हातची चव व त्यांची आत्मियता देखील अनुभवायला मिळते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.