काश्मीरबाबत पाकिस्तान आपली भूमिका कधीच सोडणार नाही. पाकिस्तानचे मंत्री प्रधानमंत्री इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) मध्ये पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उचलून धरला, पण नेहमीप्रमाणे त्यांना भारताने फटकारले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या सचिव स्नेहा दुबे यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचे उघडपणे समर्थन केल्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे.
स्नेहा दुबे यांनी राईट टू रिप्लायचा वापर करुन उत्तर दिले. त्या म्हणाल्या, ''ही पहिली वेळ नाही जेव्हा पाकिस्तानचे नेता युएनच्या व्यासपीठाचा वापर करुन माझ्या देशाविरोधात खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी नेते आपल्या देशाची वाईट स्थितीवरुन जगाचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे दहशतवादी मोकाट फिरतात आणि सर्व सामान्य नागरिक, विशेषत: अल्पसंख्यांक समुदायातील लोकांसोबत अत्याचार केला जात आहे.''
कोण आहे स्नेहा दूबे?
इमरान खान यांना साऱ्या जगासमोर सत्याचा आरसा दाखविणारी स्नेहा दूबे यांनी पहिल्या प्रयत्नांत युपीएससीमध्ये यश प्राप्त केले होते. ती 2012 च्या बॅचमधील महिला अधिकारी आहे. आईएफएस बनन्यासाठी त्यांची नियुक्ती विदेश मंत्रालयामध्ये झाली होती. उन्हे 2014 मध्ये भारतीय दूतावास मॅड्रीड येथे पाठविण्यात आले.कोन आहे स्नेहा दूबे?
इमरान खान यांनी साऱ्या जगासमोर सत्याचा आरसा दाखविणारी स्नेहा दूबे
यांनी पहिल्या प्रयत्नांत युपीएससीमध्ये यश प्राप्त केले होते. त्या 2012 च्या बॅचमधील महिला अधिकारी आहे. IFS होण्यासाठी त्यांची नियुक्ती विदेश मंत्रालयामध्ये झाली होती. 2014 मध्ये भारतीय दूतावास मॅड्रीड येथे पाठविण्यात आले. सध्या त्या संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या पहिल्या सचिव आहेत. आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये रुची पाहाता स्नेहा यांनी भारतीय विदेश सेवेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्नेहा यांनी जेएनयूमधून एमए आणि एमफीलचे शिक्षण घेतले आहे असून त्यांचे सुरवातीचे शिक्षण गोवामध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. स्नेहा यांनी सांगितले की,'' त्यांची कुटुंबातील कोणीही प्रशासकिय सेवेमध्ये नाही. स्नेहा यांचे वडिल मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात. तिची आई शिक्षिका आहे आणि भाऊ बिझनेसमन आहे. ''अशा प्रकारे जवाहरलाल विद्यापीठ, गोवा आणि दिल्ली येथील स्नेहा दुबे आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि शत्रू देशाचे सत्यही जगासमोर आणत आहे.
काश्मीर आमचे आहे आणि राहील; स्नेहा दुबे यांनी पाकला दिलं उत्तरं :
भारताची भूमिका मांडताना स्नेहा यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले, ''जम्मू काश्मीर आणि लडाख आमचेच आहे. तसेच पुन्हा एकदा पाकिस्तान हा दहशतवादाला खतपाणी घालत आहे. दहतवाद्यांना आश्रय देणं, मदत करणं आणि पाठिंबा देणं हे पाकिस्तानच्या इतिहासात आणि रणनितीमध्ये आहे. तसंच पाकिस्तानने अवैधरित्या ताबा मिळवेलला भागसुद्धा भारताचाच आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य असे भाग होते, आहेत आणि राहतील.''सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.