देशभरात सुवासिनींकडून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज वटपौर्णिमा साजरी केली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची आज पहिलीच वटपौर्णिमा आहे.
मात्र सोनालीला पहिली वटपौर्णिमा साजरी करता आली नाही. कारण ती सध्या पतीसोबत दुबईत राहत आहे.
वटपौर्णिमा साजरी करता आली नसली तरी तिने नटूनथटून काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
'आज वटपौर्णिमा, माझी पहिलीच. जरी साजरा करता येत नसली तरी जरा नटावं म्हटलं. बाकी नवऱ्याला उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ता.क.- कारण येथे वटवृक्ष नाही', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
सोनालीने ७ मे रोजी दुबईतील एका मंदिरात कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं. लग्नानंतर सोनाली आणि कुणाल पूर्व आफ्रिकेत फिरायला गेले. सेशेल्स आयलँडवरील फोटो सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.