दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूचा आज 46 वा वाढदिवस. महेश बाबूच्या स्टाईलमुळे आणि अभिनयामुळे त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दल काही खास गोष्टी...
9 ऑगस्ट 1975 रोजी चेन्नईमध्ये महेश बाबूचा जन्म झाला. त्याला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक चित्रपटांमध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले आहे.1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमारुडू या चित्रपटामधून पहिल्यांदा महेश बाबू प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वामसी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची ओळख झाली. वयाने तीन वर्षे मोठी असलेल्या नम्रताला पाहताच क्षणी महेश बाबू तिच्या प्रेमात पडला होता. ते दोघे डोट करत आहेत हे फक्त महेशच्या बहिणीलाच ठाऊक होतं. कुटुंबीय आणि प्रसारमाध्यमांपासून दोघांनी ही गोष्ट लपवली होतीअखेर १० फेब्रुवारी २००५ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली.लग्नानंतर नम्रताने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं आणि कुटुंबाकडे लक्ष देण्याला प्राधान्य दिलं. तर महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार झाला. महेश बाबू आणि नम्रताला सितारा ही मुलगी आणि गौतम हा मुलगा आहे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.