Temple of Hercules Gaditanus esakal
स्पेनमध्ये (Spain) एक प्राचीन मंदिर आहे, त्याबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आलीय. हुकूमशहा ज्युलियस सीझर (Julius Caesar) आणि रोमन लोक (Roman People) या मंदिरात पुजा करण्यासाठी येत होते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
स्पेनमध्ये (Spain) एक प्राचीन मंदिर आहे, त्याबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आलीय. हुकूमशहा ज्युलियस सीझर (Julius Caesar) आणि रोमन लोक (Roman People) या मंदिरात पुजा करण्यासाठी येत होते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.या सर्व लोकांनी भगवान हर्क्युलसकडं शक्ती मिळावी, म्हणून प्रार्थना केली होती. पुरातत्वशास्त्रज्ञ या गोष्टीचा संपूर्ण शोध लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.प्राचीन कागदपत्रांनुसार, हे मंदिर इसवी सनपूर्व नवव्या शतकात बांधलं गेलं होतं. याला 'हर्क्युलस गॅडिटेन' मंदिर (Temple of Hercules Gaditanus) असंही म्हणतात. सेव्हिल विद्यापीठ दक्षिण स्पेनमध्ये (University of Seville South Spain) आहे.या विद्यापीठातील संशोधकांचं म्हणणं आहे, की इथं स्मारक इमारतीच्या खुणा आढळल्या आहेत. लाइट डिटेक्शन आणि रेंजिंगचा वापर करून सॅंक्टी पेट्री चॅनलमध्ये हे मंदिर बांधलं गेलंय. या मंदिराची लांबी 984 फूट, तर रुंदी 492 फूट आहे.या बेटाचा आकार एकेकाळी जिथं मंदिर होतं, तितकाच आहे. हर्क्युलस गॅडिटेनसचं मंदिर 'स्तंभांचं मंदिर' असल्याचंही म्हटलं जातं. या मंदिरात अखंड ज्योत तेवत होती. या मंदिरातील पुजारी हा दिवा लावायचे. मंदिराच्या खांबावरील प्रतिमा पितळात कोरलेल्या हर्क्युलसच्या बारा मजुरांचं काम दर्शवितात.यापूर्वी, वायव्य पाकिस्तानमध्ये (Pakistan) 2,300 वर्षे जुनं बौद्ध मंदिर (Buddhist Temple) सापडलं होतं. हे बौद्धकालीन मंदिर पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांनी शोधून काढलं होतं.उत्खननात मौल्यवान कलाकृतीही सापडल्या आहेत. हे मंदिर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात सापडले. असं म्हटलं जातं, की हे मंदिर पाकिस्तानमधील बौद्ध काळातील सर्वात जुनं मंदिर आहे. दररोज शास्त्रज्ञ अनेक रहस्यमय शोध लावतात, ज्याच्या मागं अनेक कथा जोडलेल्या आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.