भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mangeshkar) यांचे आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलीवूडवर शोककळा पसरल्याचे दिसून आले. तसेच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील लतादीदींच्या निधनावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लता मंगेशकर या १९९९ ते २००५ पर्यंत राज्यसभेच्या सदस्या होत्या. पण खासदारकीच्या कार्यकाळाबद्दल त्या नाखूष होत्या. राज्यसभेसाठी त्या फारशा इच्छुक नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.संपूर्ण मंगेश कुटुंबाचे कला क्षेत्राशी नाते आहे. लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची स्वतःची नाट्य कंपनी होती.त्यांच्या दोन बहिणी आशा भोसले व उषा मंगेशकर या पार्श्वगायिका आहेत. तिसरी बहीण मीना खडीकर या लेखिका आहेत तर भाऊ हृदयनाथ मंगेशकर संगीतकार व गायक आहेत.
संगीतकार नौशाद यांच्याबरोबर गाणे ध्वनिमुद्रित करीत असताना स्टुडिओतील उष्मा सहन न झाल्याने बेशुद्ध पडल्याची माहिती लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत दिली होती.
स्वतःची गाणी कधी ऐकत नसल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. जर गाणी ऐकली तर त्यात १०० चुका लक्षात येतील, असे कारण लतादीदींनी सांगितले होते.
मदन मोहन हे सर्वांत लोकप्रिय संगीत दिग्दर्शक असल्याचे लता मंगेशकर सांगत. ‘जहाँआरा’ चित्रपटातील ‘वह चुप रहे’ हे त्यांचे आवडते गाणे होते.
त्या भारतातील एकमेव गायिका होत्या, ज्यांनी प्रथम लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गायन केले होते.
लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने प्रभावित होऊन फ्रान्स सरकारने २००७मध्ये त्यांना ‘लिजंड ऑफ ऑनर’ हा सन्मान दिला होता.
सर्वाधिक गाणे गाणाऱ्या पार्श्वगायिका असलेल्या लता मंगेशकर यांचे नाव १९७४ मध्ये गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले होते. मोहमंद रफी यांनी त्याला विरोध केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.