कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागू केला आहे.
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून पुढील आदेश येईपर्यंत साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाउन (Strict lockdown) लागू केला आहे.यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद राहणार आहोत. अत्यावश्यक दुकानांसह सेतू, आधार केंद्रे व सीएंची कार्यालये, शैक्षणिक साहित्याची दुकाने (केवळ घरपोच सुविधेसाठी) सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहणार आहेत.आजपासून लॉकडाउनच्या अंमलबजावणीला साताऱ्यात सुरुवात झाली असून शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत नागरिकांची तपासणी सुरु केली आहे.साताऱ्यातील पोवई नाका येथे बाहेर गावावरुन शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात असून आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे पालन करीत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal) यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पाचव्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यातून येण्यासाठी पासची आवश्यकता असून त्याचीही तपासणी केली जात आहे. (फोटो : प्रमोद इंगळे ) ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.