students of zilla parishad school in trimbakeshwar taluka write with both hands at the same time esakal
नाशिक : बालवाडीची पोरं तीसपर्यंतची पाढे, तर आठवी इयत्तेपर्यंतची मुलं ८११ पर्यंतचे पाढे अगदी सहज म्हणतात. दोन वेगवेगळ्या विषयांचे लिखाण वहीतील डाव्या आणि उजव्या पानावर एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहितात. विश्वास बसणार नाही, असे अलौकिक कौशल्य असलेली ही बालके आहेत हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) या आदिवासी पाड्यावरील. गुजरातच्या सीमेलगत व नाशिकपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या या पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील एक- दोन नव्हे तर तब्बल साठ विद्यार्थ्यांची शैक्षणिक कौशल्ये थक्क करणारी आहेत.
कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्राचे पुरते हाल बघायला मिळत आहेत. ऑनलाइन अध्ययनाला मर्यादा असल्याने शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी पछाडले जात आहेत. पण टॉवरची रेंजही नसलेल्या हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) या आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ गुणवत्तावाढीची संधी ठरली आहे.गेल्या वर्षभराच्या कालावधीत येथील सुमारे साठ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिखाणाचे कौशल्य आत्मसात केलेले आहे. दोन दिवसांत एक पाढा यापर्यंत या विद्यार्थ्यांनी तब्बल ८११ पर्यंतचे पाढे आत्तापर्यंत पाठ केलेले आहेत, हीदेखील कुतूहल निर्माण करणारीच गोष्ट आहे.पाड्यासह नजीकच्या भागातून विद्यार्थी या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थी शाळेत येण्यास सुरवात करतात. म्हणतात ८११ पर्यंतचे पाढे! बालवाडीत दाखल झाल्यावर विद्यार्थ्यांना तीसपर्यंतचे पाढे तोंडपाठ असतात. इयत्ता पहिलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी सर्व विषयांत प्रगत असतात. मराठी, इंग्रजीचे वाचन, गणिताच्या चार क्रिया (बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार), तीसपर्यंत पाढे, इंग्रजीची चौदाखडी अगदी न अडखळता म्हणतात.शहरातील पालक शाळा निवडताना उपलब्ध पायाभूत सुविधांना प्राधान्य देतात. पण हिवाळी पाड्यातील शाळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कौलारू शाळेत भौतिक सुविधा नसल्या तरी नजर जाईल तिथे मात्र ज्ञानाचा भांडार बघायला मिळतो.छतापासून फरशी, भिंती, खांब कुठेही नजर गेली तरी सामान्य, व्यावहारिक, भाषाज्ञान विद्यार्थी ग्रहण करू शकतात. टाकाऊपासून टिकाऊ, स्वच्छता, टापटीपपणा अशा विविध बाबींतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.यावेळी शिक्षक केशव गावित म्हणाले, सेवेत दाखल होण्याच्या स्वप्नांच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून शाळेतील सर्व विद्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहीत आहेत. यामुळे त्यांचा डावा व उजवा असे दोन्ही मेंदू विकसित होत असून, त्याचा त्यांच्या करिअरमध्ये उपयोग होईल. ग्रामस्थ, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दर्जेदार शिक्षण देणे शक्य झालेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.