Surekha Punekar Facebook @surekhapunekar
केवळ एक तमाशा कलावंत एवढ्यावरच मर्यादित न राहता सुरेखा पुणेकर यांनी लोककला क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे.
पायात घुंगरु बांधून श्रृंगाररसाचं सादरीकरण करणं एवढ्यावरच लावणीला मर्यादीत न ठेवता लावणीला जनमाणसात रुजवण्याचं काम करणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम सुरु केलं. वयाच्या आठव्या वर्षी पारावरच्या तमाशामधून त्यांनी कामाला सुरुवात केली. तेराव्या वर्षी सुरेखा पुणेकर मोठ्या बहिणीसह दत्तोबा तांबे यांच्या तमाशामध्ये काम सुरु केलं. त्यानंतर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या फडात त्यांनी काम केलं. पुढे त्यांच्या कलेचं सादरीकण चांगलं होत गेल्यानंतर वेगवेळ्या तमाशाच्या फडात त्यांना बोलावलं जाऊ लागलं. पुरुषांची मक्तेदारी असल्याचा शिक्का बसलेल्या लावणीवर त्यांनी ‘नटरंगी नार’ सारख्या खास महिलांसाठी तयार केलेल्या लावणी कार्यक्रमाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. तिथुन त्यांच्या प्रवासाला पुन्हा एकदा गती मिळालं.पुढे त्यांच्या लावणीला महाराष्ट्रभारत ओळख मिळाली. राज्यात, देशात आणि विदेशात देखील त्यांचे कार्यक्रम गाजले. अमेरिकेच्या मॅडिसन चौकात देखील त्यांच्या लावणीचा कार्यक्रम गाजला. वेगवेळ्या टीव्ही कार्यक्रमांत, चला हवा येऊ द्या, डान्सचे कार्यक्रम आणि मराठी बीग-बॉस २ मध्ये देखील त्या पाहायला मिळाल्या. बैठकीतली लावणी, खडी लावणी अन पतंगाच्या लावणीसह लावण्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सादर केले. त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामामुळे लावणी म्हणजे सुरेखा पुणेकर आणि सुरेखा पुणेकर म्हणजे लावणी असं समीकरण तयार झालं. त्यांच्या याच कलेनं वेगवेगळ्या कलाकारांना भुरळ घातली. एकेकाळी तमाशाच्या फडात काम करणाऱ्या सुरेखा पुणेकर मोठ-मोठ्या कलाकारांसोबत दिसू लागल्या.कधीकाळी लावणी आणि तमाशापुरत्या मर्यादीत असणाऱ्या सुरेखा पुणेकर टील्ही कार्यक्रमांमधून घरा-घरात पोहोचल्या.१९९८ च्या लावणी मोहोत्सवात त्यांनी भाग घेतला. याच कार्यक्रमात ‘या रावजी बसा भाऊजी’ या त्यांच्या लावणीनं त्यांनी मोठ-मोठ्या दिग्गजांचं मन जिकलं. राजकारण आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी त्यांच्या कलेचं कौतूक केलं.सुरेखा पुणेकर याच नावाने त्या आज ओळखल्या जात असल्या, तरी त्याच्या वडीलांचं आडनाव मात्र टाकळीकर होतं. पुण्याचं नाव प्रसिद्ध असल्यानं, तमाशाला त्याचा फायदा होईल म्हणून पुणेकर हे नाव दिल्यातं त्या सांगतात.‘लोककला सादरीकरणाच्या निमित्ताने छोट्याशा खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतचा आजवर खूप मोठा प्रवास झाला. गोरगरीब जनतेचे प्रश्न अडचणी जवळून पहिल्या, खूप वाटायचे त्यांच्या समस्या मांडाव्यात, सोडवून घ्याव्यात; परंतु केवळ भावनिक होऊन गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय ताकदही पाठीशी असायला असे म्हणत त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.