'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम सोनू उर्फ निधि भानुशाली (Nidhi Bhanushali) ही सोशल मिडिया क्वीन आहे. काही वर्षांपूर्वी सिरिअल सोडल्यानंतर देखील निधीची सोशल मिडिया फॉलोईंग खूप वाढली आहे. निधीने आता सर्फिंग (Surfing) करताना काही फोटो शेअर केले आहे. निधीचा हा अवतार पाहून तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसू शकतो.
सध्या निधीचे कित्येक फोटो व्हायरल होत आहे. निधी आता कर्नाटकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
निधीने कर्नाटकमधील मुल्की येथे समुद्रकिनारी सर्फिंग करतानाचे तीन सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. पहिला फोटोमध्ये ती हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती तरंगताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये अगदी फिल्मीस्टाईलने आपले केस झटकत आहेत. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करणारी आहेत.
हे फोटो शेअर करत निधीने लिहिले की, 'दुसऱ्या दिवशी पाण्यात थोडा वेळ घालवला. आजकाल मला पाहिजे तितका वेळ शूट करण्यासाठी काढणे थोडे कठीण झाले आहे, परंतु आवड तशीच आहे.
निधी मुल्कीच्या फोटोंना त्याचे चाहते खूप पसंत करत आहेत, इतकेच नाही तर ते सतत त्याच्या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
याआधी निधी लडाखला सुट्टीसाठी गेली होती, तिथूनही तिने तिचे सर्व फोटो शेअर केले होते.
निधि भानुशालीबाबत (Nidhi Bhanushali) सांगायचे झाले तर ती सोशल मिडियावर सक्रिय आहे आणि बॅगपॅक टुरिस्ट आहे. निधी भानुशाली नेहमी आपल्या फॉलोअर्ससोबत प्रवास करतानाचे सुंदर फोटो शेअर करते. तिचा एक यूट्यूब चॅनेल देखील आहे जिथे आपल्याला फॉलोअर्सला ती देशभर भ्रमंतीसाठी घेऊन जाते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.