Clutch and Chain of Bike Sakal
बाईकच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिच्या काही पार्ट्सची (Parts of Bike) काळजी घेणं खूप महत्त्वाचं असते. काही लोकांना बाईक वापरताना काय काळजी घ्यावी हे माहितच नसतं. त्यामुळे गाडीच्या लाईफवर परिणाम होतो. गाडीचा क्लच आणि चैन हे अत्यंत महत्त्वाच्या पार्ट्सपैकी एक आहेत. क्लच आणि चैनची काळजी कशी घ्यावी याची माहिती आपण घेणार आहोत. (How to Take care of the bike's chain and clutch?)
1. चैन सैल होणे- चैनच्या बाबतीत सामान्य समस्या असते ती म्हणजे ती वारंवार सैल होते. त्यामुळे प्रत्येक सर्व्हिसिंगला गेल्यावर ती आवळून घ्यावी. 2. चैनची सफाई- चैनला लागलेली घाण हटवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बाईक स्मूथ चालण्यासाठी ते गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक सर्व्हिसिंगवेळी चैन साफ करून घ्या. 3. स्प्रे- बाजारामध्ये विविध प्रकारचे स्पे उपलब्ध आहेत, जे चैनला लावल्यामुळे चैन आरामात साफ होते. 4. पाणी- चैनला पाण्याने धुवू नये. त्यामुळे चैनला गंज लागू शकतो. तुम्ही वेळोवेळी चैन मेकॅनिककडून तपासून घ्यावी. 5. क्लचसाठी टिप्स –क्लचचं मुख्य काम गिअर शिफ्टींग करणं हे आहे. त्याचा वापर करणं खूपच सोपे असतं.6. क्लच सैल होणे- क्लचच्या वारंवार वापरानंतर क्लच सैल होतो. त्यामुळे मेकॅनिकडून तो आवळून घ्यावा. 7. क्लच जास्त टाइटसुद्धा असता कामा नये. गाडी चालवताना तुम्हाला सोपं पडावं अशा पद्धतीने तुम्ही त्याचं सेटिंग करू शकता. 8. इंजिनवर ताण – गाडी चालवताना क्लच दाबून ठेवू नये. त्यामुळे इंजिनवर जोर पडतो आणि क्लचप्लेटही जाऊ शकते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.