मित्र बनवण्यापासून ते गप्पांपर्यंत प्रत्येकवेळी ट्रेनचा प्रवास आपल्यासाठी नेहमी खास असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच सुंदर रेल्वे मार्गांबद्दल सांगणार आहोत. चला तर, जाणून घेऊ काय खासियत आहे या मार्गांची..
गोवा वास्कोडिगामा -लोंडा (Goa Vasco da Gama-Londa) : आपण डोंगरावर राहता अथवा मैदानी भागात राहत असाल, तर इथले डोंगर आणि सपाट दोन्ही प्रकारचे दृश्य बघायला मिळतील. गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या जगातील सर्वात उंच धबधबा दूधसागरमधून ही रेल्वे जाते. त्यामुळे या मार्गावरील निखळ सौंदर्य आपल्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही.केरळ एर्नाकुलम : कोल्लम-त्रिवेंद्रम (Kerala Ernakulam Railway Station) : आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी केरळ खूपच प्रसिद्ध आहे. शिवाय, येथील रेल्वे मार्ग आपल्याला जीवनातील सर्वात चांगल्या रेल्वेच्या प्रवासाचे अनुभव देतो. ही रेल्वे प्रसिद्ध बॅक वॉटरमधून निघते याचे सौंदर्य आपल्याला पुन्हा केरळच्या प्रवासाला येण्यास भाग पाडते.दार्जलिंग टॉय ट्रेन (Darjeeling Toy Train) : हा रेल्वे ट्रॅक भारतातील सर्वात प्राचीन पर्वतीय रेल्वे मार्गापैकी एक आहे. हा प्रवास न्यू जलपाईगुडीपासून सुरु होतो आणि आपल्याला चहाच्या बागा, उंच डोंगर आणि घनदाट जंगलाचे दृश्य दाखवतो. हा मार्ग आपला प्रवास सुखद करुन सोडतो.नीलगिरी माउंटन रेल्वे (Nilgiri Mountain Railway) : हा क्षेत्र तमिळनाडूमधील मेटटुपालयमपासून ऊटीपर्यंत विस्तारित आहे. 1908 मध्ये बनलेली ही रेल्वे निलगिरी पर्वतरांगातील सुमारे 16 बोगदे आणि 250 पुलांवरून जाते. त्यामुळे बोगदे आणि पुलांवरुन प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल, तर या मार्गाला भेट द्यायलाच हवी. काश्मीर व्हॅली रेल्वे (Kashmir Valley Railway) : आपल्या आयुष्यात एकदातरी हा रेल्वे प्रवास अनुभवायला हवा. कारण, या प्रवासादरम्यान दिसणारे बर्फाच्छादित डोंगर हा संपूर्ण प्रवास खास बनवतील. शिवाय येथे असणारे निसर्गरम्य वातावरण आपल्या डोळ्याचे पारणे फेडतील.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.