नाशिक : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपोत्सवाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झालेले आहेत. दिवाळीनिमित्त नवीन कपडे, घराची सजावट करण्यासाठी लागणारे साहित्यासह अन्य खरेदीचा जोर सध्या बघायला मिळतो आहे. वीक एंडनिमित्त रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठ शिवाजीरोड, मेनरोड परीसर ग्राहकांनी तुडूंब भरला होता.
दिवाळीच्या सजावटीसाठी आकर्षक असे आकाशकंदील बाजारात दाखल झाले आहेत.आकाश कंदील, दिवे, विद्युत रोषणाईसाठी दिव्यांच्या माळा असे गृहसजावटीचे भरपुर पर्याय व्यावसायिकांनी उपलब्ध करुन दिले आहे.अनेक ग्राहकांकडून दुकानांऐवजी हॉकर्सकडून खरेदीला प्राधान्य दिले. हॉकर्सकडे महिलांचे ड्रेस मटेरीयलचे भरपुर पर्याय उपलब्ध असल्याने धुमाळ पॉईंट ते दहीपुल या भागात महिला ग्राहकांची झालेली लक्षणीय गर्दी.दिवाळीत फराळ हा आकर्षणाचा केंद्र असतो. बाजारपेठेत
रेडीमेड फराळाची मोठी मागणी आहे. घाऊक बाजारपेठ गृहसजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. घराला लावण्याच्या तोरणाचे भरपुर पर्याय येथे उपलब्ध झाले असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वीक एंडनिमित्त रविवारी शहरातील मुख्य बाजारपेठ शिवाजीरोड, मेनरोड परीसर ग्राहकांनी तुडूंब भरला होता.कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे दिवाळीचा सण हा उत्साहात साजरा होत असून बाजारपेठांसहित नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.