Shabaash Mithu, Hit The Case, Bajare Da Sitta And The Warrior esakal
तिकिटाबारीवर हिंदी चित्रपटाचे तारे पुन्हा एकदा आपला प्रभाव गमवताना दिसत आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चार हिंदी चित्रपटांनी बाॅक्स ऑफिसवर चारही खानना चित करुन टाकले आहे. राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेल्या हिट द फर्स्ट केसचे कलेक्शन तरीही शनिवारी थोडासे चांगले झाले. मात्र शाबास मिथू चांगली कामगिरी करेल हे दिसत नाही. राम गोपाल वर्माचा चित्रपट लडकी द ड्रॅगन गर्ल आणि विक्रम भट दिग्दर्शित 'जुदा होके भी' चेही कलेक्शन दखल घ्यावी असे नाही. दुसरीकडे तामिळमध्ये प्रदर्शित चित्रपट 'द वाॅरिअर' ने गुरुवारी भव्य ओपनिंगनंतर शुक्रवारी आणि शनिवारीही कलेक्शन चांगले राहिले आहे. एमी विर्कचा पंजाबी चित्रपट बाजरे दा सिट्टाचे ओपनिंगही सरासरीचेच दिसले आहे.
शाबाश मिथूला आता सांभाळणे अवघड : हिंदी चित्रपटात क्रिकेटवर आधारित चित्रपट पाहण्यास प्रेक्षक फार उत्साही असल्याचे दिसत नाही. तापसी पन्नूचा बऱ्याच दिवसानंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला चित्रपट शाबाश मिथू पाहण्यासाठी शनिवारी जवळपास शुक्रवार इतकेच प्रेक्षक आले होते. चित्रपटाने शुक्रवारी देशभरात फक्त ५० लाख रुपयांपर्यंत कलेक्शन केले. शनिवारी सुरुवातीच्या आकडेवारीनुसार कमाई जवळपास ५५ लाख रुपये राहिली.
'हिट द फर्स्ट केस'चे कलेक्शन : पहिल्या दिवशी शुक्रवारी हिट द फर्स्ट केसने फक्त १.३५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा आहे. दुसऱ्या दिवशी कमाईत ४३ टक्क्यांनी वाढ होऊन ती १.९३ कोटींपर्यंत पोहोचली. चित्रपटाला छोट्या शहरात प्रेक्षकांना शोधावे लागत आहे. मल्टिप्लेक्समध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृहात थोडा बहुत उत्साह पाहायला मिळत आहे. 'बाजरे दा सिट्टा'ची जेमतेम कमाई : जस ग्रेवाल दिग्दर्शित एमी विर्कचा चित्रपट बाजरे दा सिट्टाचे कलेक्शनही शनिवारी जवळपास १५ टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. तानिया, सीमा कौशल आणि रुपिंदर रुपी यांची यात भूमिका आहे. चित्रपटाने शुक्रवारी जवळपास ४० लाख रुपयांची कमाई केली. शनिवारी या वाढ होऊन ४६ लाखांचा गल्ला जमला. हिंदी चित्रपटातील दिग्गज संगीत कंपनी टीप्सने हा पंजाबी चित्रपट बनवला आहे.
अव्वल राहिला द वाॅरियर :
बाॅक्स ऑफिसवर या आठवड्यात तामिळ चित्रपट 'द वाॅरियर' गाजवताना दिसत आहे. साई पल्लवी स्टारर असलेला हा चित्रपट तेलगूतही प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट गुरुवारीच प्रदर्शित झाला होता. शुक्रवारी सुमारे ३.६५ कोटी तर शनिवारी चार कोटींची कमाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.