Russia Ukraine War: रशिया व युक्रेनमध्ये आज सातव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. शांतता चर्चा होऊनही दोन्ही देश माघार घेण्यास तयार नाही. रशियाचा (Russia) हा शस्त्रास्त्रांचा (weapons) मोठा निर्यातदार देश आहे. जगातील महासत्ता अशी ओळख रशियाला पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचा आहे. अण्वस्त्रसज्ज रशियाकडे अनेक घातक शस्त्रे आहेत.
पोसीडॉन पाणतीर: रशिया नवा पोसीडॉन हे अण्वस्त्रधारी पाणतीर तयार करीत आहे. हा पाणतीर अण्वस्त्रधारी, स्वयंचलित पाण्याखालील वाहन आहे. याचा आवाका मोठा आहे. सात फूट व्यास आणि १०० टन वजनाएवढे अण्वस्त्र त्यात सामावलेले आहे. हे शस्त्र अतिविनाशकारी समजले जाते. रशियाच्या कोणत्याही किनाऱ्याहून अमेरिकेतील शहरे त्याच्या टप्प्यात येतात. ‘के-३२९’ या बेलगोरोड पाणबुडीच्या साह्याने पोसीडॉन पाणतीर डागण्याचे रशियाचे लक्ष्य आहे. यामुळे पाण्यामध्ये विस्फोट होऊन समुद्रात किरणोत्सर्गी सुनामी येऊ शकते. सुनामीमुळे किनाऱ्यालगतच्या गावांमध्ये ३०० फूट उंचीच्या लाटा निर्माण होऊ शकतात. या सुनामीतून कोणाचा जीव वाचला तरी त्याच्यावर किरणोत्सर्गाचा परिणाम अनेक वर्षे राहू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.गेल्या ३० वर्षांत तयार झालेली बेलगोरोड ६०४ फूट लांबीची पाणबुडी जगातील सर्वांत मोठी पाणबुडी आहे. एस-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली: ही प्रणाली अत्यंत शक्तीशाली मानली जाते. या प्रणालीचा वापर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या २५० किलोमीटर दूरपर्यंतच्या क्रूझ क्षेपणास्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्राविरोधात केला जाऊ शकतो. क्षेपणास्त्र प्रक्षेपक, रडार आणि फिरते कमांड केंद्र असे तीन प्रमुख भाग असतात. यामध्ये आठ प्रक्षेपक व ३२ क्षेपणास्त्र एकावेळी असतात. पँटसीर एस-१ हवाई संरक्षक प्रणाली ः ही एक फिरती क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली आहे. यात एक विमानविरोधी बंदूक आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी १२ क्षेपणास्त्रे आणि जोन ३० मिलिमीटरच्या तोफा यात असतात. विमानांशिवाय बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्र व अचूक निशाण्यावर सोडलेली शस्त्रे नष्ट करण्यासाठी पॅंटसीरचा वापर करता येतो.
एमआय - २८ सुपरहंटर हेलिकॉप्टर ः अमेरिकेच्या एएच- ६४ अपाचेप्रमाणे हे एक शक्तिशाली हेलिकॉप्टर आहे. सुधारित हॅवॉक मॉडेलवर आधारित असलेल्या या हेलिकॉप्टरच्या मदतीने नव्या सेंसरच्या मदतीने रात्री उड्डाण करणे आणि हल्ला करणे शक्य होते. २५० किलोमीटर अंतराच्या क्षमतेसह २९९ किलोमीटर प्रतितास वेगाने ते उडू शकते.आरएस-२४ यार्स: हे तीन टप्प्यातील इंधनयुक्तक्षेपणास्त्र आहे. १० हजार ४६० किलोमीटर एवढ्या अंतरासह १५० ते २५० टनाचे तीन ते सहा स्वतंत्र रूपातील बहुउद्देशीय पुनर्वापरयोग्य क्षेपणास्त्र वाहक (एमआयआरव्ही) तैनात करू शकते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.