Harbhajan Controversy esakal
सुप्रसिद्ध भारतीय फिरकी गोलंदाज (Spin bowler) हरभजन सिंग Harbhajan Singh यानं क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टर्मिनेटर म्हणून ओळख असलेल्या हरभजनने भारताला अनेक सामने जिंकून दिले. 2007 आणि 2011च्या विश्वविजेत्या संघाचा हरभजन भाग होता. हरभजन सिंग आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक वादाचे (Controversy) प्रसंग आले.
1. मंकी प्रकरण- 2007-08 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. मेलबर्नमधील पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारत 0-1 अशा पिछाडीवर होता. परंतु सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरत होता. या मॅचमध्ये पंचांनी भारतीय संघाच्या विरुद्ध अनेक निर्णय दिले. शिवाय मैदानात प्रचंड तणाव दिसत होता. हरभजन सिंगचा अँड्र्यू सायमंड्सशी वाद झाला होता. ज्यानंतर रिकी पॉण्टींगने अंपायरकडे तक्रार केली. हरभजनवर वर्णभेदात्मक टिप्पणी केल्याचा आरोप केला. हरभजनने सायमंड्सला मंकी म्हटल्याचा आरोप करण्यात आला. सुरुवातीला हरभजनवर चार सामन्यांची बंदी घालण्यात आली होती, परंतु नंतर मात्र आयसीसीने ही बंदी मागे घेतली.
2. हरभजननं श्रीसंतच्या श्रीमुखात लगावली- IPL 2008 मध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्या पंजाब किंग्ज) यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजन सिंगने एस. श्रीसंतच्या (Shrishant) श्रीमुखात लगावली होती. हरभजनने नंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याची माफी मागितली होती. हरभजनने या घटनेनंतर म्हटलं होतं की, "मी जे केले ते मी करायला नको होते. जर आयुष्यात एखादी गोष्ट असेल जी त्यांना परत जाऊन सुधारता येईल, तर ती म्हणजे 'स्लॅपगेट."3.हरभजन नडला पाकिस्तानला- 2010 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये हरभजन सिंगने मोहम्मद आमिरच्या (Amir) गोलंदाजीवर षटकार मारत भारतीय संघाला विजय प्राप्त करून दिला होता. या सामन्यात हरभजन आणि शोएब अख्तर यांचा वाद खूप गाजला. या सामन्यात पाकिस्ताननं 267 धावा केल्या होत्या. भारतीय टीमला लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण जात होतं. परंतु सुरेश रैना आणि हरभजन सिंगने टीमला विजय प्राप्त करून दिला होता'4. इंस्टाग्राम वाद-हरभजनसिंगने त्याच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे वाद निर्माण झाल्यानंतर माफी मागितली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये हरभजनने माजी फुटीरतावादी नेता जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांना शहीद म्हटले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी हरभजनला प्रचंड ट्रोल केलं होतं. काहींनी त्यांना खलिस्तान समर्थक म्हणून संबोधले. या प्रकारानंतर हरभजनने ही पोस्ट डिलीट केली आणि माफीही मागितली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.