चिकू हे साधारण सर्वांचेच आवडते फळ म्हणावे लागेल. चिकुची मधुर फळामध्ये गणना केली जाते. आरोग्यदृष्ट्या ते उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात चिक्कू खाण्याचे जबरदस्त फायदे कोणकोणते आहेत ते…
उर्जा निर्माण करते
चिकू या फळात साखरेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे या फळातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते.कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे. शिवाय चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे आलेला थकवा नाहिंसा होतो. हाडे मजबूत करते
कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ, हाडांच्या मजबुतीसाठी हे फळ फायदेशीर ठरते. डोळ्यांच्या विकारात उपयुक्त
चिकूमध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्यांच्या विकारात हे फळ उपयुक्त ठरते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी ऑक्सिडंट या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम केले जाते. केसांसाठी फायदेशिर
चिकुचे संपुर्ण फळच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असल्याने या विकारात हे फळ फायदेशीर ठरते. शिवाय चिकूच्या बियांचे तेल केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते. हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण
पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.श्वसनातील अडथळे दूर करते
कफ आणि श्वासनासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो. एवढेच नाही तर सर्दी झाली असेल तरी हे फळ खाणे उपयुक्त ठरते. त्वचेसाठी फायदेशिर
चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.तेव्हा हे सर्व आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी चिकूचे सेवन रोज करणे उत्तमच मानले आहे. सध्या चिकू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अश्या वेळी चिकू खाणे अधिक फायद्याचे आणि आरोग्यवर्धक मानले जाते. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.