Indian Cricket Team esakal
भागवत चंद्रशेखरनं 22 फेब्रुवारी 1976 रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
फैज फजल (Faiz Fazal) - भारतीय सलामीवीर फैज फजलनं 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केलं होतं. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर फजलला भारतीय संघात (Indian Cricket Team) स्थान मिळालं. या सामन्यात त्यानं लोकेश राहुलच्या साथीनं फलंदाजी करताना 61 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 55 धावांची खेळी केली.पंकज धर्मानी (Pankaj Dharmani) - पंकज धर्मानी हा एक यष्टीरक्षक फलंदाज होता. ज्यानं 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात धर्मानीनं फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो भारताकडून खेळला नाही. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa Cricket team) टीम इंडियाचा 27 धावांनी पराभव केला.परवेझ रसूल (Parvez Rasool) - जम्मू-काश्मीरचा फिरकी गोलंदाज परवेझ रसूलनं 5 वर्षांपूर्वी भारतासाठी पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारताकडून खेळणारा तो पहिला काश्मिरी खेळाडू आहे. रसूलनं 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका इथं पदार्पण केलं होतं. या सामन्यात रसूलनं 10 षटकात 60 धावा देत 2 बळी घेतले. मात्र, त्यानंतर तो कधीच भारतीय संघात परतू शकला नाही.पंकज सिंह (Pankaj Singh) - पंकज सिंहनं 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केलं होतं. झिम्बाब्वे, भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेसाठी त्याची निवड झाली. पदार्पणाच्या सामन्यात पंकजनं 7 षटकं टाकली आणि 45 धावा दिल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही. पंकजचा हा पहिला आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना (ODI Match) होता.भागवत चंद्रशेखर (Bhagwat Chandrasekhar) - भागवत चंद्रशेखरनं 22 फेब्रुवारी 1976 रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात चंद्रशेखरनं 7 षटकं टाकली होती, ज्यात त्यानं 36 धावा देत 3 बळी घेतले होते. इतकी चांगली कामगिरी करूनही चंद्रशेखरला पुन्हा एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.