नागपूर : आज सोशल मीडियाला (social media) फार महत्त्व आले आहे. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबूकवर कोणत्या खेळाडूचे, नेत्याचे, अभिनेत्याचे किती फॉलोअर्स आहे याकडे अनेकांचे लक्ष लागलेले असते. ज्याचेही फॉलोअर्स जास्त होतात त्याची बातमी झाल्याशिवाय (king of social media) राहत नाही. आपल्या खेळाच्या बळावर लोकांच्या मनावर राज्य करणारे अनेक खेळाडू सोशल मीडियावर राज्य करून करोडोंची कमाई (Making Millions on Social Media) करीत आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची माहिती आणि त्यांचे फॉलोअर्सबद्दल... (These-players-rule-over-social-media)
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. विराटचे इंस्टाग्रामवर ६२.८ दशलक्ष फॉलोअर्ससह आहेत. तसेच तो चार कोटी रुपयांची कमाई करतो.अँथोनी जोशुआ या ब्रिटिश बॉक्सरने सोशल मीडियावरून कमाईच्या बाबतीत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याची कमाई १२ लाख असून, इन्स्टाग्राम फॉलोअर्स ११.३ दशलक्ष आहेत.२२४ दशलक्ष फॉलोअर्स असलेला ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा पोर्तुगीजचा फुटबॉलर आहे. रोनाल्डो इंस्टाग्रामवरून १८ कोटी रुपये कमावतो.डेव्हिड बेकहॅम हा सुप्रसिद्ध इंग्लिश फुटबॉलर आहे. तो इंस्टाग्रामवरून चार कोटी रुपये कमावतो.दानी अल्वेस हा ब्राझीलचा फुटबॉलर आहे. अल्वेस इन्स्टाग्रामवर ३१ दशलक्ष फॉलोअर्ससह आहेत. त्याची कमाई एक कोटी ३७ लाख रुपये आहे.ज्युनिअर नेमार हा ब्राझिलचा प्रसिद्ध फुटबॉलर आहे. त्याचे इंस्टाग्रावप १३९ मिलियन फॉलोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवरून ११ कोटी रुपये कमावत असतो.ड्वेन वेड हा अमेरिकेचा बास्केटबॉल खेळाडू आहे. त्याचे इंस्टाग्रामवर १६.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याची एकूण कमाई एक कोटी ४७ लाख रुपये आहे.लिओन मेस्सी हा अर्जेंटीनाचा प्रसिद्ध फुटबॉलर आहे. तो १२ कोटी रुपये कमावत असतो. त्याचे १५४ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत.ज्लातान इब्राहिमोविक हा स्वीडनचा स्ट्रायकर आहे. त्याचे इंस्टाग्रामवर ४३.२ दशलक्ष फॉलोअर्स असून १ कोटी ९० लाख रुपये सोशल मीडियावरून कमावतो.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.