Drinking Water Sakal
फोटोग्राफी

जेवणानंतर लगेच पाणी पिताय? तर,सहा समस्यांना जाल सामोरे

लोकांना जेवताना किंवा नंतर लगेच पाणी प्यायची सवय असते

सकाळ डिजिटल टीम

काही लोकांना (People) जेवताना ( Meal) सारखे पाणी (Water) लागते. तर काहींना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण तुमची ही सवय तब्येतीवर (Health) परिणाम करू शकते. आयुर्वेदानुसार जेवणाच्या आधी किंवा ३० मिनिटानंतर १ ते २ ग्लास पाणी प्यायले पाहिजे. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनाच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तविक पाणी आणि अन्न पचनसंस्थेत एकत्र विरघळतात. त्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. असे सारखे होत राहिल्यास अनेक प्रकारच्या शारिरिक समस्या निर्माण होतात.

पचनक्रियेत अडथळा- जेवणानंतर (Meal) लगेच पाणी (Water) प्यायल्याने पचनसंस्थेतील रसांवर परिणाम होतो. हे रस जेवण पचविण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतात. जर ते रस पाण्यात विरघळले तर अन्न पचायला अधिक वेळ लागतो. अनेकदा तर जेवण नीट पचतही नाही.
इन्शुलिन (insulin) वाढते- जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असल्यास तुमच्या इन्शुलिन हार्मोन्सवर परिणाम करते. त्यामुळे इन्शुलिनचा स्तर वाढून मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
एसिडीटीवर (Acidity) परिणाम- पोटात आम्लाचे प्रमाण जास्त असेल तर अन्ननलिकेद्वारे ते घशात पोहोचते. त्यामुळे आंबट ढेकरा येण्याची समस्या वाढते. त्याला ऍसिड रिफ्लक्स (Acid Reflux) म्हणतात. जंकफूड, सिगरेट ओढण्याव्यतिरिक्त या सवयींमुळे आंबट ढेकर येऊ शकते.
छातीत जळजळ जेवताना पाणी प्यायल्याने पाचक रस आणि एल्जाइम्सची एकाग्रता कमी होते. यामुळे शरीरात आम्लाची पातळी वाढून हृदयात जळजळ होते.त्याला हार्टबर्न (Heart Burn) असेही म्हणता येईल.
पोषकतत्वांवर परिणाम- पचनसंस्था (Digestive system) फक्त अन्न (Food)पचवत नाही तर पोषकतत्वेही शोधून घेते. अशात जर जेवण नीट पचले नाही तर पोषकतत्वांवर परिणाम होऊन ती नीट शोषली जात नाहीत.
लठ्ठपणाचे कारण अन्नाचा थेट संबंध पचनसंस्थेशी असतो. जर जेवण पचले नाही तर अपचन खाने (Indigested Food) झालेल्या अन्नापासून तयार झालेले ग्लुकोज चरबीत बदलते. यामुळे हळूहळू जाडेपणा वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT