दिवसभरात आपण अनेक पदार्थ खात असतो. वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद दिवसभरात घेत असतो. आहारात अनेक हेल्दी घटक असूनही बऱ्याच वेळा काही पोटदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी खाण्यामध्ये बदल झाल्याने या समस्या उद्भवतात. याचे कारण असते काही गोष्टी, पदार्थ अवेळी खाणे..
खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असू शकतात. तसेच आहारामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. परंतु कोणते पोषक तत्व शरीरासाठी गरजेचे आहे जाणून घेणे महत्वाचे आहे. काही वेळा काही पदार्थ अवेळी खाल्ल्याने शरीराला नुकसानीचे ठरु शकते. यासाठी आम्ही आज सांगणार आहोत की, कोणत्या वेळी काय खाल्ले पाहिजे..
बटाटा -
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे पचण्यास थोडे कठीण जाते. त्यामुळे शक्य असल्यास ब्रेकफास्ट पदार्थांमध्ये याचा समावेश करुन घ्या. यामुळे दिवसभर पचनासाठी सोपे होईल. असे न केल्यास रात्रभर याचा त्रास होण्याची शक्यता असते. मेवा -
मेवा कोणत्याही वेळी तुम्ही खाऊ शकता. परंतु सकाळच्या वेळी याचे सेवन केले तर ते उत्तम राहते.
सफरचंद -
सफरचंदमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे याला दूधासोबत खाऊ नये. जर तुम्ही ब्रेकफास्ट दरम्यान दुध घेत असाल तर सफरचंद सांयकाळी किंवा दुपारी खाऊ शकता. ओट्स
ब्रेकफास्ट दरम्यान ओट्स खाल्ले तर अधिक चांगले आहे. हे पचण्यासाठी हलके असते. शिवाय यामध्ये पोषणतत्व अधिक असल्याने डॉक्टरही हे खाण्याचा सल्ला देतात. संत्री -
विटामीन सी साठी संत्री सर्वोत्तम आहे. याला पाणी देणार फळ असेही म्हटंले जाते. त्यामुळे दिवसभरात कधीही तुम्ही याचे सेवन करु शकता. मात्र सकाळी उठल्यानंतर कधीच याच्या ज्यूसचे सेवन करु नका. त्यामुळे तुम्हासा गॅसचा प्रोब्लेम उद्धभवू शकतात.
केळी -
केळी ही तात्काळ एनर्जी देण्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे सकाळी नाश्तासाठी तुम्ही केळी खाऊ शकता. शिवाय सांयकाळी ४ च्या दरम्यान तुम्ही हलका नाश्ता म्हणूनही खाऊ शकता. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.