Job Tips: आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर गाईडन्स (Career Guidance) वेबसाइट्स, अॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये (Campus Placement) नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर काही गोष्टी लक्षात घेऊनच अर्ज करा.
1. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पात्रतेच्या आधारावर नोकरी मिळते. यासाठी तुमचा रेझ्युमे प्रभावी असणे आवश्यक आहे. त्याच्या मदतीने नोकरीसाठी अर्ज करणे सोपे होते. यासोबतच तुम्हाला त्या जॉब प्रोफाईलची समज आणि कौशल्येही असली पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला रिक्रूटमेंट एजन्सी किंवा एचआरसाठी शॉर्टलिस्ट करणे सोपे करते.
2. चांगल्या CV ने सुरुवात करा- तुम्ही नोकरी शोधण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रभावी रेझ्युमे (Resume) तयार करणे महत्त्वाचे आहे. रेझ्युमे ही कोणत्याही कामाची पहिली पायरी असते. त्यात तुमची शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये यांची संपूर्ण माहिती असते.
3. नकाराची भीती काढून टाका- नोकरीच्या मुलाखतीत किंवा कोणत्याही प्रक्रियेत तुम्हाला नकार मिळाल्यास घाबरू नका. ही शेवटची संधी नाही हे लक्षात ठेवा. यानंतरही तुम्हाला अनेक संधी मिळतील, जिथे तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकाल.
4. वेळेवर अर्ज करा- कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना, अंतिम मुदत इत्यादी लक्षात ठेवा. नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर, तुम्ही तिथून कॉल येण्याची वाट पाहत आहात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे, असे होऊ नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.